पालघर नायगाव पश्चिमेकडील उड्डाणपूलाच्या परिसरात असलेल्या झुडपात मृतदेह एका बॅगेत भरून टाकण्यात आला होता. वालीव पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. पोलीस त्याच्या शोध घेत आहेत. नायगाव पश्चिमेकडील उड्डाणपूलाच्या खाली शुक्रवारी दुपारी एक प्रवासी बॅग आढळून आली. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बॅगेची तपासणी केली. या बॅगेत चादरीमध्ये एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह गुंडाळून टाकण्यात आला होता. तिच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आली होती.
वालीव पोलिसांनी या मुलीची ओळख पटवली असून ती अंधेरी येथे राहणारी आहे. गुरूवारी ती बेपत्ता असल्याची तक्रार आल्यानंतर अंधोरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला होता.
मारेकरी ट्रेनमध्ये घेऊन आला मृतदेह प्रवासी बॅगेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपी लोकल ट्रेनमधून उतरून या ठिकाणी आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आम्ही आरोपीची ओळख पटवली असून लवकरच त्याला अटक करू अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली.