ETV Bharat / state

'या' ठिकाणी आदिवासी मुलांना शेतात मिळतात शिक्षणाचे धडे, विवेकानंद दिसले यांचे स्तुत्य उपक्रम - पालघर जिल्हा विशेष बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा भरवणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याने सरकारने ऑनलाइन वर्ग भरवण्याच्या सूचना शाळांना दिले आहे. मात्र, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना इंटरनेट, मोबाईल यांसह विविध अडचणींना सामना करावा लागत असल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. तलासरी तालुक्यातील सुत्रकार गावात विवेकानंतर देसले या शिक्षणाने या अडचणी समजून घेत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत शेतातच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वर्ग भरवणे सुरू केले आहे.

शेतात विद्यार्थ्यांना शिकवताना देसले गुरूजी

author img

By

Published : Nov 3, 2020, 8:09 PM IST

Updated : Nov 3, 2020, 10:42 PM IST

पालघर (तलासरी) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद आहे. यामुळे ऑनलाइन वर्ग भरविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, अनेक ठिकाणचे विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यामुळे तलासरी तालुक्यातील सुत्रकार गावातील महाराष्ट्र विद्या मंदिर येथील शिक्षक विवेकानंद देसले यांनी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाचे सर्व नियम पाळत शेतातच शैक्षणिक धडे देत आहेत.

'या' ठिकाणी आदिवासी मुलांना शेतात मिळतात शिक्षणाचे धडे

आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित

विवेकानंद देसले यांनी सर्व प्रथम पाड्यांवर भेटी देऊन विद्यार्थ्यांचे फोननंबर तसेच व्हॉट्सऍप नंबर घेऊन त्याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास घेऊन त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. पण, पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क, इंटरनेट, पालकांकडे अ‌ॅण्ड्रॉइड मोबाइल, लॅपटॉप नसल्याने ऑनलाइन शिक्षण आदिवासी मुलांपर्यंत पोहोचविणे कठीण असल्याचे देसले यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्वतः लिहून तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकेच्या झेरॉक्स प्रती मुलांना दिल्या. पण, काहीच न शिकवता मुलांना स्वाध्याय सोडवण्यास अडचणी येत होत्या.

शेतात विद्यार्थ्यांना शिक्षण

विवेकानंद देसले यांनी सुत्रकार येथे गावातील एका शेतातच ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे ठरविले. त्यानुसार सूत्रकार गावातील एका शेतात सोशल सोशल डिस्टन्सिंग व कोरोना विषयीचे नियम पाळत 10-15 विद्यार्थ्यांचे गट तयार केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना शेतातच शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. याचा बराच फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. पालक वर्गाचासुध्दा या उपक्रमाला पाठिंबा मिळाला असून सुत्रकार येथील शाळेचे मुख्याध्यापक सखाराम थापड हेही देसले यांना सहकार्य करत आहेत.

हेही वाचा - मराठा समाजाला 'ओबीसी'तून आरक्षण देऊ नये, विविध मागण्यांसाठी पालघरमध्ये आंदोलन

Last Updated : Nov 3, 2020, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.