ETV Bharat / state

तानसा, मोडकसागर धरण ओसंडून वाहण्याच्या मार्गावर; नदीकाठावरील गावांना सावधगिरीचा इशारा - Mumbai Municipal Corporation

पावसाची स्थिती कायम राहिल्यास जलसाठ्याच्या पातळीत वाढ होऊन ही धरणे ओसंडून वाहू शकतात. त्यामुळे वैतरणा नदीकाठच्या 42 गावांना तर तानसा नदीकाठावरील 33 गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 15, 2019, 11:14 PM IST

पालघर (वाडा)- तानसा आणि मोडक सागर ही धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे तानसा आणि वैतरणा या नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. पावसाची आणि धरणाच्या जलसाठ्याची पातळी पाहता धरण काही काळात ओसंडून वाहणार असल्याने मुंबई महापालिकेने ठाणे व पालघर जिल्हा प्रशासनाला 15 जुलैला पत्रक काढून नदीकाठावरील गावांना सावधगिरीचा इशारा देण्यासोबत उपाययोजनांबाबत सुचविले आहे.

तानसा येथील तानसा धरणाची 15 जुलैला दुपारी 12 वाजेपर्यंत पाण्याची पातळी 126.781 मीटर्स टिएचडी ( 415.95 फुट टिएचडी ) आहे. तर जलसाठ्याची 128.62 मीटर्स टिएचडी (422.00 फुट टिएचडी) आहे.

शहापूर तालुक्यातील खर्डी येथील मोडकसागर (वैतरणा) धरणाची जलसाठ्याची पातळी 15 जुलै दुपारी 12 वाजेपर्यंत 160.842 मीटर्स टिएचडी (527.70 फुट टिएचडी) तर 163.147 मीटर्स टिएचडी (535.26 फुट टिएचडी) एवढी आहे.

पावसाची स्थिती कायम राहिल्यास जलसाठ्याच्या पातळीत वाढ होऊन ही धरणे ओसंडून वाहू शकतात. त्यामुळे तानसा आणि वैतरणा नदीकाठी असलेल्या वाडा, शहापूर, भिवंडी आणि वसई या तालुक्यातील गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

वैतरणा नदी काठी वाडा तालुक्यातील दाढरे, शेले,तिळसे, गांधरे, बोरांडे या सारखी वाडा आणि पालघर तालुक्यातील मिळून एकुण 42 गावे आहेत. तानसा नदीकाठी शहापूरमधील 8, वाडा 4, भिवंडी 10 आणि वसई 9 अशी एकूण 33 गावे आहेत. या गावांना सावधगिरीचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Intro:तानसा व वैतरणा (मोडकसागर) धरण
ओसंडून वाहण्याच्या मार्गावर
वैतरणा नदी काठच्या 42 गावांना तर तानसा नदीकाठावरील 33 गावांना सावधगीरीचा इशारा

पालघर (वाडा) - संतोष पाटील
तानसा आणि मोडक सागर ही धरणे भरण्याच्या स्थितीत असल्याने या धरणाच्या तानसा आणि वैतरणा या नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.पावसाची आणि धरणाच्या जलसाठ्याची पातळी पहाता धरण काही काळात ओसंडून वाहणार असल्याने बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे व पालघर जिल्हा प्रशासनाला 15 जुलैला पञक काढून नदीकाठावरील गावांना सावधगिरीचा उपाययोजनेबाबत सुचविले आहे.
शहापूर तालुक्यातील खर्डी येथील मोडकसागर आणि तानसा येथील तानसा धरण यांची 15 जुलै रोजी दुपारी 12 वाजण्यापर्यंत तानसा पाण्याची पातळी 126.781 मीटर्स टिएचडी ( 415.95 फुट टिएचडी ) आहे. तर जलसाठ्याची 128.62 मीटर्स टिएचडी (422.00 फुट टिएचडी) तर वैतरणा (मोडकसागर )धरणाची जलसाठ्याची पातळी 15 जुलै दुपारी 12 वाजे पर्यंत 160.842 मीटर्स टिएचडी (527.70 फुट टिएचडी) तर 163.147 मीटर्स टिएचडी (535.26 फुट टिएचडी) एवढी जलसाठ्याची पातळी असुन ही धरणे पावसाची स्थिती ओसंडून वाहू शकतात.त्यामुळे या धरणांच्या नदीकाठी असलेल्या वाडा,शहापूर,भिवंडी आणि वसई या तालुक्यातील गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
वैतरणा नदी काठी वाडा तालुक्यातील दाढरे, शेले,तिळसे, गांधरे, बोरांडे या सारखी वाडा आणि पालघर तालुका एकुण 42 गावे आहेत.तर तानसा नदी काठची गावे शहापूर मधील 8,वाडा 4,भिवंडी 10 आणि वसई 9 अशी एकूण 33 गावे आहेत.या गावांना सावधगिरीचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.