ETV Bharat / state

जव्हारमध्ये ३२ लाखांचा दारू साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - News about the State Excise Department

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे धडक कारवाई केली. यावेळी अवैद्य दारू जप्त केली. यावेळी १७ लाख ४५ हजार ५२० रुपये किंमतीचे दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले.

state-excise-department-seized-illegal-liquor-in-palghar-district
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची जव्हार येथे धडक कारवाई
author img

By

Published : Dec 13, 2019, 6:04 PM IST

पालघर - महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे धडक कारवाई केली. यावेळी अवैधरित्या महाराष्ट्र येणारी दादरा नगर हवेली बनावटीची दारू जप्त केली.

दादरा नगर हवेली, दमण बनावटीची अवैध दारू मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी एका भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये तब्बल 17 लाख 45 हजार 520 रुपये किंमतीच्या दारूचे एकूण 45 बॉक्स आढळून आले. विशेष म्हणजे टेम्पोमध्ये दारू वाहतूक करण्यासाठी गुप्त, असा कप्पा तयार करण्यात आला होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची जव्हार येथे कारवाई

भरारी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 17 लाखांपेक्षा अधिक दारू, 15 लाखांचा टेम्पो, असा एकूण 32 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दादर नगर हवेली आणि दमण येथून अवैधरित्या दारू महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येणाऱ्या वाहनांवर करडी नजर राहणार आहे.

Intro:महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे धडक कारवाई; 17 लाखांपेक्षा अधिक दारू तसेच 15 लाखांचा टेम्पो असा एकूण 32 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त Body: महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे धडक कारवाई; 17 लाखांपेक्षा अधिक दारू तसेच 15 लाखांचा टेम्पो असा एकूण 32 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त 

नमित पाटील, 
पालघर, दि. 13/12/2019

       महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 31 डिसेंबरच्या धरतीवर पालघर जिल्ह्यातील  जव्हार येथे धडक कारवाई करत अवैधरित्या महाराष्ट्रात येणारी दादरा नगर हवेली बनावटीची लाखो रुपयांची दारू जप्त केली आहे. दादरा नगर हवेली तसेच दमण बनावटीची अवैद्य दारू मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा रचून केलेल्या कारवाईत तब्बल 17 लाख  45 हजार 520 रुपये  किमतीची ब्लेंडर्स प्राईड  , रॉयल चॅलेंज  , रॉयल स्टॅग , इंपिरियल ब्लु , मॅक्डोवल नो 1 असे वेगवेगळ्यरू दारूचे एकूण 45 बॉक्स एका भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये आढळून आले. विशेष म्हणजे टेम्पोमध्ये दारू वाहतूक करण्यासाठी गुप्त असा कप्पा तयार करण्यात आला होता. भरारी पथकाने धडक केलेल्या कारवाईनंतर 17 लाखांपेक्षा अधिक दारू तसेच 15 लाखांचा टेम्पो असा एकूण 32 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे 31 नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दादरा नगर हवेली आणि दमण येथून अवैधरित्या दारू महाराष्ट्रात आणली जाणार असल्याच्या शक्यतेवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाची मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून येणाऱ्या वाहनांवर करडी नजर राहणार आहे. 

Byte :-
दीपक परब - पोलीस निरीक्षक, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.