ETV Bharat / state

विरार येथे एसटी सेवेतील कोरोना कर्मविरांचा सन्मान

कोरोना काळात एसटीने मुंबई सेंट्रल ते विरार अशी अविरत सेवा देऊन वसई-विरारकरांना दिलासा दिला होता. या उपकाराची परतफेड म्हणून विरार-मुंबई एसटी प्रवासी मित्रमंडळाच्या वतीने 'कोरोना कर्मवीर सन्मान सोहोळ्या'चे आयोजन करून एसटी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

ST Staff honoured Virar
विरार येथे एसटी सेवेतील कोरोना कर्मविरांचा सन्मान
author img

By

Published : Jan 3, 2021, 6:30 PM IST

पालघर - कोविड काळात रेल्वे व अन्य वाहतूक सेवा बंद होती. कोविड-१९ मुळे देशभरात लॉकडाऊन घेण्यात आला होता. परिणामी अत्यावश्यक सेवा व अन्य सरकारी कर्मचारी आणि रुग्ण यांना मुंबईपर्यंत प्रवास करणे अडचणीचे झाले होते. अशात एसटीने मुंबई सेंट्रल ते विरार अशी अविरत सेवा देऊन वसई-विरारकरांना दिलासा दिला होता. या उपकाराची परतफेड म्हणून विरार-मुंबई एसटी प्रवासी मित्रमंडळाच्या वतीने 'कोरोना कर्मवीर सन्मान सोहोळ्या'चे आयोजन करून एसटी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

माहिती देताना विभागीय वाहतूक अधीक्षक आणि वाहक

कोविड-१९ काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांना अविरत सेवा देणाऱ्या वाहक-चालकांचे मनोबल वाढवण्यासाठी या सोहोळ्याचे आयोजन झाले. विरार कारगिल नगर येथील सागर बैंक्वेट हॉलमध्ये काल संध्याकाळी हा सोहोळा पार पडला. सोहोळ्यात एसटी सेवेतील कोरोना कर्मविरांचा सन्मान करण्यात आला. सोहोळ्याला एसटी कामगार सरचिटणीस हिरेनजी रेडकर, महाव्यवस्थापक वाहतूक संजय सुपेकर, वसई-विरार महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव व माजी नगरसेवक अजीव पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक दिगंबर भडकमकर, आगार व्यवस्थापक मुंबई आगार श्रीरंग बर्गे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - सरकारने नामांतराच्या वादात पडू नये, अन्यथा 'सरकार' पडेल - आठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.