ETV Bharat / state

Torture even after death स्मशानशेड नसल्याने मृत्यूनंतरही मृतदेहाला यातना - he dead body is tortured even after death

स्मशानभूमीच्या जागा झाल्या अनेक ठिकाणी गायब झाल्या आहेत यातच जागा आणि स्मशानशेड नसल्याने Since there is no cremation shed मृत्यूनंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत he dead body is tortured even after death.सद्या पावसाळ्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असून मृतदेहावर अंत्यसंस्कार Funeral करण्यासाठी पेचप्रसंग निर्माण होत आहेत. पाऊस थांबल्यावर पुन्हा विझलेली चिता पेटविण्यासाठी रॉकेल, डीझेल सारखे ज्वलनशील इंधन वापरुन पुन्हा चिता पेटवली जात आहे.

Torture even after death
मृतदेहाला यातना
author img

By

Published : Aug 18, 2022, 1:40 PM IST

पालघर बोईसर पूर्वेस मुख्य रस्त्यालगत असलेल्या लालोंडे गावी मृत्यूनंतरही मृतदेहाची यातना पाठ सोडत नाहीत. या गावी स्मशाभूमीसाठी जागा आहेत मात्र गावाच्या पाच पाड्यात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षा नंतर ही स्मशानशेड Since there is no cremation shed नाही. त्यामुळे जळत्या चितेवर पाऊस पडतो आणि मृत्यूनंतरही मृतदेहाचे अंत्य संस्कार सुरळीत होउ शकत नाहीत he dead body is tortured even after death असे भयानक प्रसंग अनुभवायला मिळत आहेत. पुर्वी येथील प्रत्येक पाड्यासाठी स्मशानभूमीची जागा होती मात्र येथील जागांना सोन्याचा भाव आला आणि काही पाड्यातील स्मशानभूमीच्या जागा धनदांडग्यांनी गायब केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अग्निसंस्कारात अडथळे पाऊस असला की, पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यासाठी कुठे न्यावे असा प्रश्न लालोंडे गावच्या नागरिकांना पडतो आहे. सद्या पावसाळ्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असून मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यासाठी पेचप्रसंग निर्माण होत आहेत. पावसाच्या दिवसात पावसाचे पाणी थेट चितेवर पडत आहे. पाऊस सुरुच राहिला तर अशावेळी घरी किती वेळ पार्थिव ठेवावे लागते, पाऊस उघडण्याची वाट पाहावी लागते असे अनेक प्रश्न ग्रामस्थांना पडत आहेत.

चितेला अग्नि देत नाही तोच पाऊस यापूर्वी अनेकदा असे प्रसंग ओढावले आहेत, पाऊस थोडा थांबला की अंत्ययात्रा स्मशानघाटात पोहोचते, सरण रचले जाते, आणि चितेला अग्नि देत नाही तोच पाऊस पडण्यास सुरुवात होते आणि पावसाचा वेग वाढतो त्यावेळी डोळ्यादेखत चितेवरचा अग्नि विझत असतो. अश्या वेळी साऱ्यांची एकच धावपळ उडते कधी ताडपत्रीचा आधार घेतला जातो पण तो देखिल टिकत नाही. पाऊस थांबल्यावर पुन्हा विझलेली चिता पेटविण्यासाठी रॉकेल, डीझेल सारखे ज्वलनशील इंधन घालूनच पुन्हा चिता पेटवली जाते. हा सगळा प्रकार वेदनादायी असून त्या कुटुंबातील व्यक्तीशी एकाप्रकारे चेष्टा करावी असाच प्रकार सुरू असल्याची खंत गावातील नागरिक करत आहेत.

अनेक गावातील समस्या तशाच देशात आताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला मात्र पालघर तालुक्यातील आजही अनेक गावातील समस्या तशाच आहेत त्यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मशानभूमी आणि ती नसेल तर मृत्यूनंतरही अशा प्रकारे पार्थिवाची अव्हेलना होत आहेत. दरम्यान देशात अमृत महोत्सव साजरा करण्यात आला परंतु आमच्या गावांमध्ये आजही मृतदेहाची हेळसांड होत आहे गावात स्मशानभूमी नसल्याने भर पावसात चितेला अग्नी देताना मोठे प्रसंग निर्माण होत आहेत त्यामुळे आमचे जिल्हा प्रशासनाला एकच मागणी हे तात्काळ आमच्या गावाला स्मशान शेड भूमी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रोशन गवळी यांनी ग्रामस्थानच्या वतीने केली आहे

स्मशाभूमीचा रस्ता गायब सहा वर्षापूर्वी स्मशानभूमीच्या जागेची पाहणी केली गेली त्यासाठी फुलाचा पाडा आणि गवळी पाडा येथे रस्त्याचे ग्रामपंचायतीतर्फे खडीकरण करण्यात आले. मात्र आज हे रस्तेच गायब झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या निक्रियतेमुळे रस्ते, स्मशानशेड नाही हे दुःख येथील गावकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले आहे याकडे गांभीर्याने लक्ष देतील का? अशी आर्त हाक गावकरी प्रशासनाला देत आहेत.

हेही वाचा Palghar pregnant woman babies death रस्त्या अभावी डोलीतून नेण्यात आलेल्या गर्भवती महिलेची दोन जुळी मुले दगावली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.