ETV Bharat / state

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला कारणे दाखवा नोटीस - palghar marathi news

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रियेसाठी कारखान्यांमधून येणाऱ्या सांडपाण्याचा दर्जा राखला जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे व्यवस्थापन करणाऱ्या तारापूर एन्व्हॉयरमेंट प्रोटेक्शन सोसायटीला नुकताच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला कारणे दाखवा नोटीस

author img

By

Published : Apr 7, 2021, 8:24 PM IST

पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रियेसाठी कारखान्यांमधून येणाऱ्या सांडपाण्याचा दर्जा राखला जात नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे व्यवस्थापन करणाऱ्या तारापूर एन्व्हॉयरमेंट प्रोटेक्शन सोसायटीला नुकताच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुचवलेला उपाययोजनांकडे दुर्लक्ष:-

प्रदूषण नियंत्रण मंडळाने 22 जानेवारी 2019 रोजी 25 दश लक्ष घनमीटर क्षमतेच्या जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यामध्ये या केंद्रामध्ये सांडपाणी पाठवणाऱ्या उद्योगांनी सांडपाण्याची ऑनलाइन पद्धतीने दर्जा तपासण्याची यंत्रणा तसेच नॉन रिटन व्हावल व ऑटोसंपलेर बसून एमआयडीसीकडून त्याचे प्रमाणीकरण 26 फेब्रुवारीपर्यंत करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याबाबतचा कार्यपालन अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला नसल्याचे या नोटिशीत म्हटले आहे.

सांडपाणी प्रक्रिया केंद्राला कारणे दाखवा नोटीस-

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 10 मार्च व 15 मार्च रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये येणाऱ्या सांडपाण्याचा दर्जा प्रकल्प मापदंड (डिझाईन परमीटरस) पेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याचा परिणाम सांडपाणी प्रक्रियेवर होण्याची शक्यता पाहता सांडपाणी प्रक्रिया केंद्र विरद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ज्यांनी बजावली आहे. या नोटिशीला तीन दिवसात उत्तर देण्याची मर्यादा देण्यात आली असून अन्यथा हे केंद्र बंद का करण्यात येऊ नये करण्याबाबत सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

हेही वाचा- सचिन वाझेंचा नवा लेटर बॉम्ब.. पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी देशमुखांनी मागितले दोन कोटी !

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.