ETV Bharat / state

गरिबांसाठी शिवभोजन, मग कुपोषित बालकांच्या पोषण आहाराचे काय?

शिवभोजन योजनेच्या १० रुपयांचा थाळीचा गवगवा सुरू असताना भुकेल्या बालकांसाठी दोषरहित योजना बनविण्याचा विचार सरकारच्या मनात का आला नाही, असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.

Vivek Pandit Shivbhojan protests
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित
author img

By

Published : Jan 28, 2020, 9:31 PM IST

पालघर - महाविकास आघाडी सरकारने गरीब गरजूंसाठी दहा रुपयात शिवभोजन योजनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनापासून केला आहे. हे स्वागतार्ह असून मात्र दहा रुपयात जेवणाची थाळी उपलब्ध करून देणाऱ्या शासनाला सप्टेंबर २०१९ पर्यंतचा अमृत आहार योजनेचा निधी देता आलेला नाही. शासन निर्णयाप्रमाणे तीन महिन्याचा आगाऊ निधी उपलब्ध करून देण्याचे नमूद असताना आधीचाच निधी अजून मिळाला नसल्याने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी संताप व्यक्त करत शिवभोजन योजनेपेक्षा भुकेल्या बालकांच्या पोषण आहाराचे बघा अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सरकारला दिला आहे.

प्रतिक्रिया देताना श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित

जिल्ह्यातील कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत असून २०१५ साली शासनाच्या आकडेवारीनुसार एका वर्षात ६०० बालक कुपोषणामुळे मृत्युमुखी पडलेत. तर, तब्बल ७ हजार बालक मरणासन्न अवस्थेत होते. या काळात कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि तत्कालीन शासनाने अमृत आहार ही सदोष योजना जाहीर केली. दुर्दैवाने ही योजना तयार करतानाच अनेक त्रुटी असल्याने योजनेच्या अंमलबजावणीमध्ये देखील अनेक त्रुटी आढळल्या. शासनाला एका वर्षानंतर लगेच या योजनेचा विस्तार करून गर्भवती आणि मातांसोबतच ७ महिने ते ६ वर्षाच्या बालकांचाही या योजनेचा लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला.

आज ४ वर्षानंतरही या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. या योजनेसाठी आगाऊ तीन महिन्याच्या निधीची तरतूद असावी, असे नमूद असताना मागील तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीतील निधीही उपलब्ध होत नाही हे दुर्दैव आहे. कुपोषणाने पालघरमधील दुर्गम भाग आजही धगधगत आहे. आकडेवारी कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात हे प्रमाण दखलपात्र आहे, असे विवेक पंडित यांनी सांगितले आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित शासनाचा महत्त्वाचा दुवा म्हणजे अंगणवाडी सेविका आहेत. राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यातील १०५ बाल विकास प्रकल्पात ही योजना सुरू आहे. यात असलेल्या अंगणवाडी सेविकेला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मिळणारा निधी आणि तिला व मदतनीस यांना मिळणारे मेहनताना हा अक्षरशः थट्टा करणारा आहे. त्यात आहे तोच निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने उसनवारी करून या सेविका योजना राबवत तर आहेत, पण हे केवळ शासनाच्या अंमलबजावणी अहवालाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हे कदापी नाकारता येणार नाही.

ज्यांना स्वतःला मिळणारे ५ ते ६ हजार वेतन तीन-तीन महिने मिळत नाही. त्या ४० ते ५० हजाराची थकलेली बिले असताना योजना कसे राबवू शकतात, याचे उत्तर केवळ अशक्य असेच आहे. कागदावर रेगोट्या ओढून अहवाल सादर करण्यापूरती ही योजना मर्यादित राहिली हे नक्की. मात्र, यात रोजगाराच्या शोधात असलेल्या बेरोजगार बापाची पत्नी असलेल्या आपल्या भुकेल्या आईच्या पोटात नव्या उद्याचा मोकळा श्वास घेऊ पाहणारे कोवळे गर्भ, निष्पाप अर्भक आणि निरागस बालकांचा बळी हा जातच राहील हे शल्य अस्वस्थ करणारे आहे. आता शिव भोजन योजनेच्या १० रुपयांचा थाळीचा गवगवा सुरू असताना भुकेल्या बालकांसाठी दोष रहित योजना बनविण्याचा विचार सरकारच्या मनात का आला नाही, असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा- जव्हार संस्थानाचा ऐतिहासिक वारसा भग्नावस्थेत; प्रशासनाचे दुर्लक्ष

Intro:गरिबांसाठी शिवभोजन, मग कुपोषित बालकांच्या पोषण आहाराचे काय?? श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांचा  सवालBody:

   गरिबांसाठी शिवभोजन, मग कुपोषित बालकांच्या पोषण आहाराचे काय?? श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांचा  सवाल

नमित पाटील,
पालघर, दि.28/1/2020

   महाविकास आघाडी सरकारने गरीब गरजूंसाठी  दहा रुपयात शिवभोजन योजनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनापासून केला आहे. स्वागतार्ह असून मात्र दहा रुपयात जेवणाची थाळी उपलब्ध करुन देणाऱ्या शासनाला सप्टेंबर 2019 पर्यंतचा अमृत आहार योजनेचा निधी देता आलेला नाही. शासन निर्णयाप्रमाणे तीन महिन्याचा आगाऊ निधी उपलब्ध करून देण्याचे नमूद असताना आधीचाच निधी अजून मिळाला नसल्याने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी संताप व्यक्त करत शिवभोजन योजनेपेक्षा भुकेल्या बालकांच्या पोषण आहाराचे बघा अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सरकारला दिला आहे.

    पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत असून 2015 साली शासनाच्या आकडेवारीनुसार एका वर्षात 600 बालक कुपोषणामुळे मृत्यूमुखी पडली. तर तब्बल सात हजार बालक मरणासन्न अवस्थेत होती. या काळात कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि तत्कालीन शासनाने अमृत आहार ही सदोष योजना जाहीर केली. दुर्दैवाने ही योजना तयार करतानाच अनेक त्रुटी असल्याने योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. शासनाला एका वर्षानंतर लगेच या योजनेचा विस्तार करुन गर्भवती आणि मातांसोबतच 7 महिने ते 6 वर्षाच्या बालकांचाही या योजनेचे लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला.   

     आज 4 वर्षानंतरही या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. या योजनेसाठी आगाऊ तीन महिन्याच्या निधीची तरतूद असावी, असे नमूद असताना मागील तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीतील निधीही उपलब्ध होत नाही हे दुर्दैव आहे. कुपोषणाने पालघरमधील दुर्गम भाग आजही धगधगत आहे. आकडेवारी कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात हे प्रमाण दखलपात्र आहे, असं विवेक पंडित यांनी आहे.

     या योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित शासनाचा महत्वाचा दुवा म्हणजे अंगणवाडी सेविका आहेत. राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील 105 बाल विकास प्रकल्पात ही योजना सुरू आहे. यात असलेल्या अंगणवाडी सेविकेला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मिळणारा निधी आणि तिला व मदतनीस यांना मिळणारे मेहनताना हा अक्षरशः थट्टा करणारा आहे. त्यात आहे तोच निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने उसनवारी करुन या सेविका योजना राबवत तर आहेत, पण हे केवळ शासनाच्या अंमलबजावणी रिपोर्टची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हे कदापी नाकारता येणार नाही.

     ज्यांना स्वतःला मिळणारे 5-6 हजार वेतन 3-3 महिने मिळत नाही, त्या 40 ते 50 हजाराची थकलेली बिल असताना योजना कसे राबवू शकतात, याचे उत्तर केवळ अशक्य असेच आहे. कागदावर रेगोट्या ओढून अहवाल सादर करण्यापुरती ही योजना मर्यादित राहिल हे नक्की मात्र यात आपल्या रोजगाराच्या शोधात असलेल्या बेरोजगार बापाची पत्नी असलेल्या आपल्या भुकेल्या आईच्या पोटात नव्या उद्याचा मोकळा श्वास घेउ पाहणारे कोवळे गर्भ, निष्पाप अर्भक आणि निरागस बालकांचा बळी हा जातच राहील हे शल्य अस्वस्थ करणारे आहे. आता शिव भोजन योजनेच्या 10 रुपयांचा थाळीचा गवगवा सुरू असताना भुकेल्या बालकांसाठी दोष रहित योजना बनविण्याचा विचार सरकारच्या मनात का आला नाही, असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.