ETV Bharat / state

Shirdi railway : सुरत मार्गे शिर्डी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी - वसई मार्गे साईनगर शिर्डी

Shirdi railway : डहाणू स्थानकातून सुटणारी गाडी पुर्ववत करावी, यासाठी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेच्या मुंबई रेल्वेचे डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर यांना त्यांच्या कार्यालयात भेट देऊन निवेदन देण्यात आले आहे.

रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी
रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी
author img

By

Published : Aug 4, 2022, 1:26 PM IST

पालघर - कोविड काळात बंद असलेली सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी डहाणू स्थानकातून सुटणारी गाडी पुर्ववत करावी, यासाठी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वेच्या मुंबई रेल्वेचे डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर यांना त्यांच्या कार्यालयात भेट देऊन निवेदन दिले आहे. या बरोबरच पोरबंदरच्या दिशेने सकाळी धावणाऱ्या सौराष्ट्र एक्सप्रेसची वेळ एक तासाने पुढे ढकलण्यात आल्याने जी पोकळी निर्माण झाली आहे. त्या वेळेत डहाणूकडे जाणारी गाडी देण्यात यावी. तसेच सध्याच्या वेळापत्रकात ज्या दोन गाड्यांमधे एक तासापेक्षा जास्त अंतर आहे. त्यावेळेत उपनगरीय गाड्या सुरु कराव्या अशी मागणी सुद्धा संस्थेतर्फे DRM यांच्याकडे करण्यात आली आहे.

DRM चे आश्वासन - साई भक्तांसाठी पालघर- वसई मार्गे साईनगर शिर्डी पर्यंतच्या गाडीची मागणी करताना विविध साईभक्त मंडळांकडून आलेली १० निवेदने DRM यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली आहेत. उपनगरीय क्षेत्रात धावणाऱ्या पॅसेंजर आणि शटल गाड्यांना मेल एक्सप्रेस दर्जा असला, तरी उपनगरीय क्षेत्रातील प्रवाशांकडून मेल एक्सप्रेसचे तिकिट दर घेतले जाऊ नये, अशा आशयाचे निवेदनही देण्यात आले आहे. या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करुन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन DRM यांनी दिले आहे.

आगामी वेळापत्रक बदल - डिव्हीजन कार्यालयात भेट दिल्यानंतर संस्थेच्या शिष्टमंडळाने चर्चगेट येथील प्रधान कार्यालयाला भेट देऊन प्रिंसिपल चीफ ऑपरेटींग मॅनेजर (PCOM) यांची भेट घेऊन वरील सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करुन आगामी वेळापत्रक बदल या मागण्यांचा विचार करावा अशी विनंती केली आहे. डहाणू ते विरार चौपदरी करणाच्या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी शिष्टमंडळाने मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात भेट दिली आहे. प्रकल्पाची प्रगती, त्यात येणाऱ्या अडचणी आणि प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा विलंब अशा विषयांवर विस्तृत चर्चा करुन प्रकल्पाचा आढावा घेतला आहे. संस्थेच्या शिष्टमंडळात नागदेव पवार, सतीश गावड, दयानंद पाटील, प्रथमेश प्रभूतेंडोलकर आणि महेश पाटील यांचा समावेश होता.

संस्थेने सादर केलेल्या प्रमूख मागण्या -

1. डहाणू हून सुटणारी सकाळची ७:०५ ची लोकल पुर्ववत करणे

2. सकाळी डाऊन दिशेने सौराष्ट्र एक्सप्रेस च्या पूर्वीच्या वेळेत डहाणूच्या दिशेने जाणारी उपनगरीय गाडी सुरु करणे

3. वेळापत्रकात असलेले एका तासापेक्षा जास्त अंतर कमी करणे

4. पालघर - वसई मार्गे साईनगर शिर्डी पर्यंत गाडी सुरु करणे

5. उपनगरीय क्षेत्रात पँसेंजर व मेमू गाड्यांसाठी मेल एक्सप्रेसचे भाडे न आकारणे

6. संध्याकाळची ४.५० वाजताची दादर- डहाणू ही गाडी पूर्ववत करणे

हेही वाचा - शिंदे गट आणि शिवसेनेतील वादावर ८ ऑगस्टला होणार सुनावणी, निवडणूक आयोगाला 'हे' दिले सर्वोच्च निर्देश

हेही वाचा - Bhimashankar Fort : दोन वर्षाच्या चिमुरडीचा अकरा तासात सर केला भीमाशंकर गड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.