विरार (पालघर) - वसई विरारमधील डायलिसिस रुग्ण आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हे रुग्ण आमदारांच्या कार्यालयात पत्रासाठी खेटे मारत आहेत. ट्रेनने प्रवास करू देत नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. कागदपत्र पाहून तरी प्रवेश देण्याची आणि ट्रेनमध्ये सुविधा देण्याची रुग्णांची मागणी आता आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उचलून धरली आहे. याप्रकरणी रेल्वेमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे हा विषय पोहोचवण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार असल्याचे सुतोवाच आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
सोनू जाधव हे हृदयविकाराचे रुग्ण आहेत. त्यांना उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात जायचे आहे. मात्र, सरकारने रुग्णांना रेल्वेत प्रवेश दिला नसल्याने उपचाराविना तडफडून मरावे का, असा संतप्त सवाल रुग्ण विचारत आहेत. व्यधिग्रस्त रुग्णांचे उपचाराअभावी हाल होत असल्याने या रुग्णांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्या. त्यानतंर त्यांनी पंतप्रधान, रेल्वेमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर या रुग्णांची मागणी घातली आहे.
'रुग्णांना रेल्वेतून प्रवेश देण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार' - railway services in virar
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता बहुतांशी सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहेत. वसई-विरारमध्येही रेल्वेसेवा बंद आहेत. त्यामुळे जे रुग्ण मुंबईत उपचार घेत होते, त्यांना उपचार घेणे शक्य होत नाही.