पालघर - विरार ग्लोबल सिटी परिसरातील एका घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर दोन आरोपींना अटक झाली आहे.
विरार ग्लोबल सिटी इडन रोझ महावीर गार्डन येथे वेश्या दलाल दर्शना बाने व दयानंद बाने हे मुली पुरवतात, अशी बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, पालघर आणि नालासोपारा येथील अधिकाऱ्यांना बोलावून घेतले.
यानंतर बोगस ग्राहक पाठवून अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे, अमोल बोरकर, महेश यशवंत गोसावी, बी.एम.पवार,श्याम शिंदे किणी, कांटेला, डोईफोडे, जगदाळे, यांनी छापा टाकला. या कारवाईत दर्शना बाने, दयानंद बाने यांना अटक करून तीन पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.