पालघर- पुराच्या संकटात झिका रोगाने ( Zika disease ) चिंता वाढविली आहे. जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील झाई आश्रम शाळेतील ( Zai Ashram School ) एका सात वर्षीय वर्षीय मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे आरोग्य तपासणीत समोर आले ( Zika virus patient in Palghar ) आहे. त्या मुलीवर डहाणू उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी झाई आश्रम शाळेतील एका नववर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. यानंतर तेरा विद्यार्थ्यांना उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यापैकी एका सात वर्षीय मुलीचे रक्ताचे सॅम्पल पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवले होते या अहवालात त्या मुलीला झिका व्हायरसची ( Zika case in Palghar ) लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यात गतवर्षी जुलै महिन्यात पुण्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर यावर्षी जुलै महिन्यातच पालघर जिल्ह्यात दुसरा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ( Dahanu Sub District Hospital ) हादरून गेली आहे.
आरोग्य यंत्रणेत खळबळ- ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी यांची विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी पालघर यांनी केले आहे. पालघर जिल्ह्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत. झिका रुग्ण आढळल्यामुळे पालघर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.
काय आहे झिका आजार?झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.
झिका व्हायरचा इतिहास-1940 मध्ये झीका व्हायरस सगळ्यात आधी युगांडामध्ये आढळला होता. त्यानंतर हा खूप वेगाने पसरला. अफ्रिकेतील अनेक भागात पसरून अनेकांवर हल्ला केला. नंतर हा दक्षिण प्रशांत आणि आशियाच्या काही देशांमधून लॅटिन अमेरिकेपर्यंत पोहचला. ब्राझीलमध्ये जेव्हा हा भरपूर प्रमाणात पसरला. तेव्हा काही शास्त्रज्ञांनी अंदाजा लावला की, 2014 च्या फुटबॉल वर्ल्ड कपदरम्यान आशिया आणि दक्षिण प्रशांतकडून हा आला असावा. पण यासंदर्भात अद्याप खात्री होऊ शकली नाही.
काय आहेत लक्षणे ?हा व्हायरस एंडीज इजिप्टी नावाच्या डासांमुळे पसरतो. हे तेच डास आहेत, ज्यांच्यामुळे कावीळ, डेंगू आणि चिकुनगुनियासारखे विषाणुजन्य आजर होतात. झीका संक्रमित आईकडून आपल्या नवजात बाळात जातो. हा व्हायरस ब्लड ट्रांसफ्यूजन आणि यौन संबंधामधूनही पसरतो. झीकाचे नेमके लक्षण अद्याप समोर न आल्याने याला ओळखणे थोडे अवघड असते. पण असे सांगितले जाते की, डास चावल्यानंतर, ताप रैशेज, डोके दुखी आणि सांधेदुखी होते.
झिका व्हायरसची प्रकरणे ही इतर राज्यासह विदेशातही आढळली -गेल्या वर्षी भारतात केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये झिका विषाणूचे रुग्ण आढळले होते. झिका विषाणू (ZIKV) रोग (ZVD) हा ब्राझीलमधील 2016 नंतरच्या उद्रेकाच्या चिंताजनक सार्वजनिक आरोग्य रोगांपैकी एक मानला जातो. मायक्रोसेफली, जन्मजात झिका सिंड्रोम आणि गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या घटनांशी मच्छर-जनित फ्लेविव्हायरस संबंधित असल्याचे नोंदवले गेले आहे. 1947 मध्ये युगांडातील झिका जंगलातून त्याचा शोध लागल्यापासून, आफ्रिका, दक्षिणपूर्व आशिया आणि पॅसिफिक बेटांमधून ZVD चे अनेक उद्रेक नोंदवले गेले आहेत. याशिवाय, झिकाची अनेक प्रवासाशी संबंधित प्रकरणे विविध देशांतून नोंदवली गेली आहेत. भारतात ZVD चे पहिले प्रकरण गुजरातमधून नोंदवले गेले आहे.
हेही वाचा-Zika Virus : झिका व्हायरसचा भविष्यात धोका, टाळण्यासाठी ICMR ने दिल्या सुचना
हे ही वाचा-झिका व्हायरसचा धोका टाळण्यासाठी 'या' गावात वाटले कंडोम, लैंगिक संबंध टाळाण्याचाही दिला सल्ला