वसई (पालघर) - विरार पूर्वेतील खानिवडे येथील हनुमान नगर परिसरात शुक्रवारी सकाळी ११:३० वाजण्याचा सुमारास घराच्या अर्धवट बांधकामाची भिंत कोसळली. या घटनेत घराच्या शेजारीच खेळणाऱ्या तीन चिमुकल्यांच्या अंगावर ही भिंत कोसळली. या घटनेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत.
खानिवडे येथील हनुमान नगर परिसरातील घटना -
या घटनेत दोन सख्खे भाऊ-बहीण व एक बाजूला राहणारी मुलगी यांचा समावेश आहे. यात सात वर्षीय मुलगा साहिल महेश वाघ याचा मृत्यू झाला आहे. अंकिता वाघ (वय ५) व निधी वाघ ( वय ५) या दोन चिमुकल्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका मुलाचा मृत्यू तर २ जण गंभीर जखमी -
या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दोन भाऊ बहीण असलेले साहिल व अंकिता या चिमुकल्या मुलांच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आई मोलमजुरी करून दोन मुलांचा सांभाळ करते. त्यांच्यावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गावामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
खानिवडेत घराची भिंत अंगावर कोसळून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - पालघरमध्ये घराची भिंत कोसळून मुलाचा मृत्यू
विरार पूर्वेतील खानिवडे येथील हनुमान नगर परिसरात घराच्या अर्धवट बांधकामाची भिंत कोसळून एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर दोन मुले जखमी झाली आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
![खानिवडेत घराची भिंत अंगावर कोसळून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू wall collapsed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10092419-714-10092419-1609580345664.jpg?imwidth=3840)