पालघर/ विरार- लोकलच्या रुळावर आत्महत्या करणाऱ्या एका व्यक्तीला आरपीएफच्या जवानांना वाचवण्यात यश आले. २४ फेब्रुवारीला विरार रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
आरपीएफच्या जवानांमुळे जीवनदान
एक ३२ वर्षीय व्यकती जीव देण्याच्या विचाराने रुळावर झोपला होता. तेवढ्यात समोरून एक लोकल वेगाने येत होती. ही बाब आरपीएफ जवानांच्या लक्षात येताच त्यांनी वेळीच धाव घेऊन त्या इसमाला रुळाच्या बाहेर ओढले. आरपीएफ जवानांमुळेच या इसमाला जीवनदान मिळाले आहे. कामावर जाण्याची घाई असल्याने रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. हा सगळा प्रकर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेमुळे स्थानकात एकच खळबळ उडाली होती.