ETV Bharat / state

RPF Jawan Rescued Passenger : धावत्या रेल्वेत चढताना प्रवासी कोसळला; आरपीएफ जवानांनी वाचवले प्राण - passenger collapsed on railway platform

वसई रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रेल्वे प्लॅटफॉर्मवर खाली पडलेल्या एक प्रवासी खाली पडला. या प्रवाशाचे आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) जवानांनी प्राण वाचवले ( RPF Jawan Rescued Passenger ) आहेत.

RPF Jawan Rescued Passenger
धावत्या ट्रेनमध्ये चढताना रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोसळला प्रवासी
author img

By

Published : Jan 24, 2022, 5:28 PM IST

Updated : Jan 24, 2022, 6:44 PM IST

पालघर - पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील वसई रोड रेल्वे स्थानकात ( Vasai Railway Station ) धावत्या मेल-एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर खाली ( passenger collapsed on railway platform ) कोसळला. या प्रवाशाचे आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) जवानांनी प्राण वाचवले ( RPF Jawan Rescued Passenger ) आहेत. रेल्वे स्थानकांवर घडलेली संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली.

  • #WATCH | Maharashtra: An RPF (Railway Protection Force) jawan rescued a passenger who fell down on the railway platform while trying to board a moving train at Vasai Railway Station on 23rd January. pic.twitter.com/Pxy2u467ZJ

    — ANI (@ANI) January 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अशी घडली घटना -

धावत्या ट्रेनमध्ये चढणे एका प्रवाश्याला जीवावर बेतले आहे. सई रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा तोल जाऊन पडल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे ४ वाजून ४५ वाजताच्या दरम्यान पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रंमाक ३ वर बांसवाड़ा राजस्थानला जाणारी ट्रेन येताच प्रवासी ट्रेनमध्ये बसत असताना ही घटना घडली. परिणामी ट्रेनचा दरवाजाला अडकून फरफटत तो तरुण प्रवासी जात होता. तेव्हा कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबल रमेंद्र कुमार यांनी लगेच ट्रेनकडे धाव घेतली. या जवानाने ट्रेन खाली जात असलेल्या प्रवाश्याला सह प्रवाशांचा मदतीने मागे ओढले आणि त्याचे प्राण वाचवले. त्या प्रवाशांचे नाव वेजा हर्दू मैदा असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. त्यानंतर आरपीएफ जवानी प्रथमोपचार दिला.

घटनेचा व्हिडीओ वॉयरल -

ही घटना रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये टिपली गेली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वॉयरल झाला आहे. या आरपीएफ जवानांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आरपीएफ जवान रमेंद्र कुमार यांनी सांगितले की, प्रवाशांना सुरक्षित ठेवणे आमचे हे काम आहे. मला हे काम करत असताना समाधान वाटते. प्रवाशांना आवाहन आहे की, धावती लोकल पकडू नयेत.

हेही वाचा - State temperature Update : मुंबईसह राज्यात पारा घसरला

Last Updated : Jan 24, 2022, 6:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.