ETV Bharat / state

..अखेर पालघर पोलिसांकडून घरफोडी करणारा चोर जेरबंद

चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरिता पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, वसई अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, नालासोपारा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी घरफोडी चोरींचा आढावा घेतला.

palghar police
..अखेर पालघर पोलिसांकडून घरफोडी करणारा चोर जेरबंद
author img

By

Published : Jul 29, 2020, 12:31 PM IST

पालघर / नालासोपारा - नालासोपारा परिसरात घरफोडी आणि चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. पालघर पोलिसांनी मोहीम आखून सराईत चोरट्यास अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी राहुल प्रकाश मळेकरला (वय-२९) बेड्या ठोकल्या आहेत. अधिक चौकशीत त्याने तुळींज येथे दोन घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून जवळपास अडीच लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरिता पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, वसई अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, नालासोपारा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी घरफोडी चोरींचा आढावा घेतला. गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना अटक करण्याबाबत तुळींज पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांना आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक व्हसकोटी यांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहीती मिळवून आरोपीला अटक केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.