ETV Bharat / state

वसईमध्ये कराटे प्रशिक्षकाने मुलांना दिली अमानुष शिक्षा, प्रशिक्षकावर गुन्हा दाखल - vasai

नालासोपारामधील विलीबोर्ड शाळेत कराटे शिकवणाऱ्या शिक्षकाने ६ विद्यार्थ्यांना दोनशे बैठका काढण्याची अमानुष शिक्षा दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.

विद्यार्थ्याला अमानुष शिक्षा
author img

By

Published : Feb 13, 2019, 10:51 PM IST

वसई - नालासोपारामधील विलीबोर्ड शाळेत कराटे शिकवणाऱ्या शिक्षकाने ६ विद्यार्थ्यांना दोनशे बैठका काढण्याची अमानुष शिक्षा दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे एका विद्यार्थ्याच्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तुळींज पोलिसांनी संबंधित प्रशिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वेला विलीबोर्ड नावाची खासगी शाळा आहे. या शाळेने 'ऑल इंडिया शोथोकॉन कराटे फेडरेशन' या संस्थेशी करार केला असून संस्थेचे ४ प्रशिक्षक दररोज शाळेतील मुलांना खेळ आणि इतर तंदुरूस्तीचे प्रकार शिकवण्यासाठी येत असतात. शुक्रवारी ८ फेब्रुवारी रोजी यातील एक प्रशिक्षक मणी चौधरी याने मस्ती करणाऱ्या ७ विद्यार्थ्यांना शाळेच्या गच्चीवर नेऊन २०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. ही सर्व मुले सहावीत शिकणारी होती. उठाबशा काढल्यामुळे मुलांना त्रास होऊ लागला. त्यांनी कशीतरी ही शिक्षा पूर्ण केली. मात्र, घरी गेल्यावर त्यांना पायात त्रास जाणवू लागला.

दरम्यान, छेडानगर येथील भावेश प्लाझा इमारतीत राहणाऱ्या श्रीगणेश कांबळे (वय १२) या विद्यार्थ्याच्या पायाच्या स्नायूत जबर दुखापत झाली. त्याला जागेवरून उठताही येत नव्हते. सोमवारी त्याने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी त्याला नालासोपारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पालकांनी याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आम्ही घटनेचा पचंनामा केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहोत, असे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले.

undefined

शाळेचे विश्वस्त बिली जॉर्ज यांनी रुग्णालयात भेट देऊन पालकांना १० हजारांची आर्थिक मदत केली. या प्रकरणातील प्रशिक्षक शाळेचा कर्मचारी नव्हता, असे बिलिजॉर्ज यांनी सांगितले. तो ज्या एजन्सीत होता, त्या एजन्सीला आम्ही नोटीस दिली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. त्या प्रशिक्षकाला शाळेत यापुढे बंदीही घालण्यात आली आहे. पोलीस तपासात ते सहकार्य करणार असल्याचेही ते म्हणाले.

Intro:कराटे प्रशिक्षकाने मुलाना दिली २०० उठबशा काढण्याची शिक्षा ;
एक विद्यार्थी अत्यवस्थ, प्रशिक्षकावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी, वसई ;

नालासोपारा येथील विलीबोर्ड शाळेतील कराटे शिकविणाऱ्या शिक्षकाने सहा विद्यार्थ्यांना दोनशे बैठका काढण्याची अमानुष शिक्षा दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे एखा विद्यार्थ्याला पायाच्या स्नायूला दुखापत झाली असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तुळींज पोलिसांनी संबंधित प्रशिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. Body:नालासोपारा पुर्वेला विलीबोर्ड नावाची खाजगी शाळा आहे. या शाळेत ऑल इंडिया शोथोकॉन कराटे फेडरेशन या संस्थेशी करार केला असून संस्थेचे चार प्रशिक्षक दररोज शाळेतील मुलांना खेळ आणि इतर तंदुरूस्तीचे प्रकार शिकविण्यासाठी येत असतात. शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी यातील एक प्रशिक्षक मणी चौधरी याने मस्ती कऱणाऱ्या ७ विद्यार्थ्यांना शाळेच्या गच्चीवर नेऊन दोनशे उठबसा काढण्याची शिक्षा दिली. ही सर्व मुले सहावीत शिकणारी होती. उठबशा काढल्यामुळे मुलांना त्रास होऊ लागला. कशीबसे त्यांनी ही शिक्षा पु्र्ण केली. मात्र घरी गेल्यावर त्यांना पायात त्रास जाणवू लागला. छेडा नगर येथील भावेश प्लाझा इमारतीत राहणाऱ्या श्रीगणेश कांबळे (१२) या विद्यार्थ्यांच्या पायाच्या स्नायूत जबर दुखापत झाली. त्याला जागेवरून उठताही येत नव्हते. सोमवारी त्याने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी त्याला नालासोपारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पालकांनी याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. Conclusion:या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात बालकांच्या क्रुरता विरोधी अधिनियम २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही घटनेचा पचंनामा केला असून सीसीटीव्ही तपासणार आहोत, असे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले.

 शाळेचे विश्वस्त बिलीजॉर्ज यांनी रुग्णालयात भेट देऊन पालकांना दहा हजारांची आर्थिक मदत केली. या प्रकरणातील प्रशिक्षक शाळेचा कर्मचारी नव्हता असे बिलिजॉर्ड यांनी सांगितले. तो ज्या एजन्सीत होता, त्या एजन्सीला आम्ही नोटीस दिली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. त्या प्रशिक्षकाला शाळेत यापुढे बंदीही घालण्यात आली आहे. पोलीस तपासात सर्व ते सहकार्य करणार असल्याचेही ते म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.