ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

पालघर तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला असून तीनही ग्रामपंचायतींवर तीन वेगवेगळ्या पक्षांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

results-of-three-gram-panchayats-in-palghar-district-announced
पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर
author img

By

Published : Jan 19, 2021, 5:26 PM IST

पालघर - जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला असून जिल्ह्यातील तीनही ग्रामपंचायतींवर तीन वेगवेगळ्या पक्षांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर वसई तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचा विजय झाला आहे. तसेच सत्पाळा ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आदिवासी एकता परिषद, निर्भय जन मंच पुरस्कृत ग्रामविकास पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

सागावे ग्रामपंचायतवर शिवसेना भगवा -

सागावे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पूरस्कृत युवा परिवर्तन पॅनलने 7 पैकी 4 जागांवर वर्चस्व मिळवित भगवा फडकवला. येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गावपातळीवर अनेक बैठका पार पडल्यानंतर एकमत न झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. नामनिर्देशन पत्र भरताना विरोधात एकही नामनिर्देशन पत्र न आल्याने दिपाली दिनेश राव, संदेश रवींद्र खाटाळी आणि ममता मंगेश गायकवाड हे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. 15 जानेवारी 4 जागांसाठी शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनल आणि पक्षविरहित युवा परिवर्तन पॅनलच्या 8 उमेदवारांमध्ये निवडणूक पार पडल्यानंतर आज तहसीलदार कार्यालयात मतमोजणी पार पडली. शिवसेना पुरस्कृत पॅनलचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी 2 उमेदवार विजयी करण्याचे लक्ष्य होते. आज झालेल्या मतमोजणीत 4 जागांपैकी 2 जागा जिंकून शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनलने सागावे ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्तावित केले आहे.

पाली ग्रामपंचायत बविआकडे -

वसई तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीवर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. 7 सदस्य पैकी 6 सदस्य हे बहुजन विकास आघाडीचे, तर 1 सदस्य हा शिवसेनेचा निवडून आला आहे. पाली ग्रामपंचायतमध्ये विलास दुरुगुडे हे केवळ 1 मताने निवडून आले आहेत. दूरगुडे यांना 51 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या स्विटी स्टीफन बार यांना 50 मते पडली आहेत.

सत्पाळा ग्रामपंचायतीत मनसेचे सर्वाधिक उमेदवार -

सत्पाळा ग्राम पंचायतमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ग्राम विकास पॅनलचे 11 पैकी 9 सदस्य विजयी झाले आहेत. तर 2 जागांवर बहुजन विकास आघाडीला समाधान मानावे लागले आहे. ग्रामविकास पॅनलमध्ये मनसे, आदिवासी एकता परिषद आणि निर्भय जन मंच सहभागी होते.

हेही वाचा - अंजिक्यसेनेकडून नाथन लायनला खास 'गिफ्ट'...वाचा कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.