पालघर - रिलायन्स कंपनीने गॅस पाइप लाइनसाठी भूसंपादन केलेल्या जामिनीच्या मोबदल्यात दिलेली रकम, संघटित लोकांनी लुबाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून आज त्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. उपोषणकर्त्यांमधील तीन जणांची प्रकृती खालावली असल्याचं सांगण्यात येते.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड भागातून रिलायन्स कंपनीची गॅस पाइप लाइन गेली आहे. कंपनीने या भागातील शेतकऱ्यांची जमीन संपादन केली असून त्या बद्दल त्यांनी मोबदला देण्यात आला आहे. मोबदला रक्कम संघटीत लोकांनी लुबाडली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याविरोधात पालघर पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. हे उपोषण ७ सप्टेंबरपासून सुरू आहे.
या प्रकरणी विजय वझे, योगेश चांदेकर यांच्यासह अनेक शेतकरी उपोषणाला बसले आहेत. हा शेतकऱ्यांचा मोबदल्याचा प्रश्न असून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणा-यांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. उपोषणकर्त्यंनी आपल्या 13 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे उपोषण मागे घेणार नाहीत, असा पावित्रा घेतला आहे.
हेही वाचा - प्रारूप किनारा व्यवस्थापन ऑनलाइन जनसुनावणी रद्द करा, मनसेची मागणी