ETV Bharat / state

आदिवासी पीडित अनंत मौली यांची शासनाकडून साधी विचारपूस नाही, दरेकर यांचा आरोप - मोखाडा आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू

हे सरकार संवेदनहिन असून एका आदिवासी समाजातील व्यक्तीला आधार द्यायला हवा. त्यांच्यावर कर्ज आहे. दोन मुले, पत्नी आणि मातोश्री अशा चार व्यक्तींचे आगीत मृत्यू झाला. त्या कुटुंबाच्या राहिलेल्या व्यक्तीचे भविष्याचे नियोजन करायला हवे, पण सरकार याकडे लक्ष देत नाही. ही बेफिकिरी आहे, असे राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

pravin darekar on Mokhada fire 4 members of family died
आदिवासी पीडित अनंत मौली यांची शासनाकडून साधी विचारपूस नाही, दरेकर यांचा आरोप
author img

By

Published : Apr 3, 2021, 12:35 AM IST

पालघर - जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणपाडा येथील अनंत मौली यांच्या घराला होळी सणादरम्यान रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने त्यांचे घर जळून खाक झाले आणि कुटुंबातील 4 व्यक्तींना या आगीत जीव गमवावा लागला होता. या घरातील अनंत मौली यांची प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारने पीडित कुटुंबाची विचारपूस केली नाही, असा आरोप केला. पीडित अनंत मौली यांच्या मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

प्रवीण दरेकर बोलताना

हे सरकार संवेदनहिन असून एका आदिवासी समाजातील व्यक्तीला आधार द्यायला हवा. त्यांच्यावर कर्ज आहे. दोन मुले, पत्नी आणि मातोश्री अशा चार व्यक्तींचे आगीत मृत्यू झाला. त्या कुटुंबाच्या राहिलेल्या व्यक्तीचे भविष्याचे नियोजन करायला हवे, पण सरकार याकडे लक्ष देत नाही. ही बेफिकिरी आहे, असे राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

भाजप पक्ष त्यांचा व्यवसाय पुन्हा उभारेल
भारतीय जनता पार्टी अनंत मौली कुटुंबाला मदत करून त्यांचा व्यवसाय पुन्हा उभारेल, अशी ग्वाही देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच या आगीची घटना, ही घातपात तर नसेल ना कारण अनंत मौली हे घटनेवेळी कोणीतरी पाठीमागच्या दरवाज्याची कडी बाहेरून लावली होती, असे सांगत आहेत. त्यामुळे त्या दिशेने तपास झाला पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी केली.

अनंत मौली यांच्यावर ट्रॅक्टर घेतल्याचे आणि व्यवसायासाठी घेतलेल्या मालाचे असे 10 लाखापर्यंत कर्ज आहे. सामाजिक भावनेतून ते येथील लोकांना ते मदत करीत होते. आता अनंत मौली यांचे या घटनेने कुटुंबातील 4 सदस्यांचा जीव गमावला आहे. त्याचबरोबर व्यवसाय आणि घर ही जळून खाक झाले आहे.

काय आहे प्रकरण...
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणपाडा स्टॉप येथील अनंता बाळू मौळे यांचे घर व होलसेल किराणा मालाचे दुकान होते. त्यात २८ मार्चला रात्री २.३० च्या दरम्यान अचानक शॉट सर्किटमुळे आग लागली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. घरात अनंताची चार मुले, आई व पत्नी असे सात जणांचे कुटुंब राहत होते. आगीत झोपलेल्या वृद्ध आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, मुलगी पल्लवी मौळे वय १५ तर मुलगा कृष्णा मौळे वय १० या चौघांचा झोपेतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुलगा भावेश मौळे वय १२ व मुलगी अश्विनी मौळे वय १७ हे दोघे भाजले असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. अनंत मौली यांना डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना मोखाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.