वसई (पालघर) - वसईतील एका मतीमंद मुलींच्या शाळेतून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मतीमंद मुलीच्या शोधासाठी वसई पोलिसांनी तीन पथके तैनात करून अवघ्या काही तासात तीला शोधून काढले आहे. वसई पश्चिम होळी येथील लिबीनिया निकेतन स्कूल या मतिमंदांच्या अनाथाश्रमातून रात्री आडेआठच्या सुमारास शाळेचे मुख्य गेट उघडे असताना १४ वर्षीय मतीमंद मुलगी शाळेच्या बाहेर गेली होती. मुलीचा शोध घेतल्यानंतरही मुलगी सापडत नसल्यामुळे शाळा प्रशासनाने वसई पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी तत्काळ तीन पोलिसांची पथके तैनात करून हरवलेल्या मतीमंद मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. यावेळी एका पथकाला वसई रोड रेल्वे स्थानकानजीक बस डेपो येथे ही मुलगी आढळून आली. त्वरीत तिला ताब्यात घेऊन वसई पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यानंतर तीची नंतर वैद्यकीय तपासणी करून रात्री उशीरा शाळा प्रशासनाकडे तीचा ताबा देण्यात आला.
पालघर : वसईतील शाळेतून बेपत्ता झालेल्या 'त्या' मतीमंद मुलीला शोधण्यात पोलिसांना यश - वसई पोलीस
एका पथकाला वसई रोड रेल्वे स्थानकानजीक बस डेपो येथे ही मुलगी आढळून आली. त्वरीत तिला ताब्यात घेऊन वसई पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यानंतर तीची नंतर वैद्यकीय तपासणी करून रात्री उशीरा शाळा प्रशासनाकडे तीचा ताबा देण्यात आला.