ETV Bharat / state

अवैध रेती उत्खननावर सफाळे पोलिसांची कारवाई,  77 लाख 98 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त - पालघर जिल्ह्यातील सोनावे येथे अवैध रेती उत्खननावर

पालघर जिल्ह्यातील सोनावे येथे अवैध रेती उत्खननावर सफाळे पोलिसांनी छापा टाकला. यात एकूण  77 लाख 98 हजार रुपये किमतीची रेती आणि मशिनरी जप्त केली आहे.

illigal sand mining
अवैध रेती उत्खनना
author img

By

Published : Feb 26, 2020, 8:10 PM IST

पालघर - अवैध वाळू उपसा करणाऱ्या घटना जिल्ह्यात नेहमी घडताना दिसतात. सफाळे पोलीस व महसूल विभाग यांनी सोनावे येथील वैतरणा नदी किनारी छापा टाकत लाखो रुपयांची वाळू आणि रेती उपसण्साठी लागणारी मशिनरी जप्त केली आहे.

सफाळे पोलीस व महसूल विभाग यांनी सोनावे येथील वैतरणा नदी किनारी छापा टाकला असता शासनाची परवानगी नसताना अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत 36 लाख रुपये किमतीच्या रेती, वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या 9 लोखंडी मोठ्या बोटी, 10 लाख रुपये किमतीचे रेती उत्खननकरता वापरण्यात येणारे 1 लोखंडी हायड्रोलिक सक्शन पंप, 30 लाख रुपये किमतीचे रेती उत्खनन करता वापरण्यात येणारे 5 सक्शन पंप तसेच 1 लाख 98 हजार रुपये किमतीची एकूण 36 ब्रास रेती असा एकूण 77 लाख 98 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात भादविस कलम 379, 431, 34 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48 (7), 48 (8), पर्यावरण अधिनियम 1980 कलम 15, 19 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.