ETV Bharat / state

डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्याने किराणा घेण्यास नकार; मीरारोड येथील प्रकार - delivery boy muslim

मीरा रोडच्या जया पार्क येथील रहिवासी गजानन चतुर्वेदीची यांच्या पत्नीने मंगळवारी सकाळी फोन करून किराणा सामान मागवले. हे सामान घेऊन एक डिलिव्हरी बॉय नियमांप्रमाणे सोसायटीच्या बाहेर राहून हे सामान त्यांना देऊ लागला. मात्र, यावेळी गजानन चतुर्वेदीने किराणा सामान घेऊन आलेल्या मुलाचे नाव विचारले. त्यावर आपले नाव बरकत उस्मान पटेल आहे, असे सांगितले. मुलाने आपले नाव सांगताच, मी मुसलमानांच्या हातून काहीच घेत नाही, असे सांगत चतुर्वेदीने किराणा सामान घेण्यास नकार दिला.

डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्याने किराणा घेण्यास नकार

author img

By

Published : Apr 24, 2020, 9:50 AM IST

पालघर - मीरा रोड येथे डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्यामुळे किराणा घेण्यास एकाने नकार दिला आहे. यानंतर या व्यक्तिला पोलिसांनी अटक केली आहे. गजानन चतुर्वेदी (वय - 51) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा रोडच्या जया पार्क येथील रहिवासी गजानन चतुर्वेदीची यांच्या पत्नीने मंगळवारी सकाळी फोन करून किराणा सामान मागवले. हे सामान घेऊन एक डिलिव्हरी बॉय नियमांप्रमाणे सोसायटीच्या बाहेर राहून हे सामान त्यांना देऊ लागला. मात्र, यावेळी गजानन चतुर्वेदीने किराणा सामान घेऊन आलेल्या मुलाचे नाव विचारले. त्यावर आपले नाव बरकत उस्मान पटेल आहे, असे सांगितले. मुलाने आपले नाव सांगताच, मी मुसलमानांच्या हातून काहीच घेत नाही, असे सांगत चतुर्वेदीने किराणा सामान घेण्यास नकार दिला.

हेही वाचा - मालेगाव शंभरी पार करणारा राज्यातील पहिला तालुका; एकाच दिवशी 14 कोरोना 'पॉझिटिव्ह'

या घटनेनंतर बरकतने काशिमीरा पोलीस ठाणे गाठून गजानन चतुर्वेदी विरोधात तक्रार दाखल केली. काशिमीरा पोलीस ठाण्यात चतुर्वेदी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर पोलीस अधिक तपास करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.