ETV Bharat / state

पालघरमध्ये राज ठाकरे झळकले भाजपच्या बॅनरवर!

author img

By

Published : Jan 5, 2020, 2:48 PM IST

पालघर जिल्हा परिषद तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 8 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 7 जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी वाडा तालुक्यातील पंचायत समितीत भाजप आणि मनसेची युती केली आहे.

Palghar
पालघर

पालघर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे कडवे विरोधक अशी ओळख आहे. मात्र, पालघरमधील वाडा तालुक्यात भाजपच्या बॅनरवर राज ठाकरे यांचा फोटो झळकला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज ठाकरेंचा फोटो पाहायला मिळत असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज ठाकरे झळकले भाजपच्या बॅनरवर

हेही वाचा - 'महाविकास आघाडीचे सरकार फार काळ चालणार नाही'

पालघर जिल्हा परिषद तसेच जिल्हा परिषद अतंर्गत येणाऱ्या 8 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 7 जानेवारीला यासाठी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील पंचायत समितीत भाजप आणि मनसेची युती आहे. त्यामुळे मोदी आणि राज ठाकरेंचे एकत्र एकाच बॅनरवर फोटो झळकल्याचे पाहायला मिळत आहेत. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते नारायण राणे यांचाही फोटोही या बॅनरवर पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - 'खाते वाटपावरून अब्दुल सत्तार यांच्या मनात कोणतीही नाराजी नाही'

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात भाषणे केली होती. त्यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' या वाक्याला लोकांनी चांगलेच उचलून धरले होते. त्यांनी व्हिडिओंच्या माध्यमातून पंतप्रधानांची खोटी वक्तव्यं जनतेसमोर मांडली होती. मात्र, आता मनसेच्या नगरसेवकांच्या मतदानानेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा सभापती भाजपचा निवडून आला आहे. त्यामुळे मनसे ही दुटप्पी भूमिका घेत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

Intro:पालघर जिल्हा परिषद निवडणूक 

लाव रे...तो.. व्हिडीओ....

आणि लाव रे....तो बॅनर....

भाजप उमेदवाराच्या प्रचाराच्या बॅनर वर पंतप्रधान नरेंद्र मोदी व  राज ठाकरे यांचे फोटो झळकताहेत. 

पालघर (वाडा ) संतोष पाटील 

2019 लोकसभा निवडणुकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सभा घेऊन "लाव रे.... तो व्हिडिओ असे सांगून भाजप विरोधात महाराष्ट्रात राळ उठविणा-या  मनसे अध्यक्ष राज राज ठाकरे आज पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचार बॅनरवर नरेंद मोदी यांच्या फोटो सोबत झळकत आहे.

भाजपबरोबर राज ठाकरेंची जवळकीता भाजपला  ठाणे जिल्ह्यातील  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणूकीत मनसेच्या मदतीने भाजपचा झालेला सभापती पदाचा फायदा हा पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपला  राजकीयदृष्टय़ा ही फायदेशीर ठरणार काय? आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद मोदी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकञीत फोटो उमेदवारांच्या प्रचाराच्या बॅनवर झळकणे यावर सद्या चर्चा निवडणुकीत केली जाते.

पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 57 जागांवर व आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांवर येत्या 7 जानेवारी 2020 ला मतदान होत आहे.

या जिल्हा परिषद निवडणूकीत राज्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्षातील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.तसेच येथील बहुजन विकास आघाडी व कम्युनिस्ट पक्षानेही ही ठराविक ठिकाणी आपल्या प्राबल्य असलेल्या जागांवर ते निवडणूक लढवत आहेत. 

तर पालघर जिल्ह्य़ातील वाडा पंचायत समितीच्या 

गणातील ठराविक जागांवर उमेदवार उभे केले आहेत.तर काही जागेवर त्यांनी मनसेने भाजपशी घरोबा केला आहे.

एका जिल्हा परिषद गटात दोन पंचायत समितीचे गण असतात.त्याप्रमाणे मोज जिल्हा परिषद गटात सापने आणि मोज हे दोन पंचायत समिती गण आहेत.यात सापणे गणाच्या जागेसाठी मनसेचा उमेदवार निवडणूक लढवत आहे. तर भाजपकडून आणि दोन्ही काँग्रेस कडून येथे उमेदवार दिला गेला नाही. येथे भाजपने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे  व पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर भाजपचे नेत्यांचे फोटो भाजपच्या व मनसेच्या बॅनवर एकत्रपणे दिसत आहे.या गणात शिवसेना विरोधात मनसे लढत आहे. सापणे गणाच्या जागेसाठी  शिवसेनेच्या विरोधात

 मनसे तालुका अध्यक्ष यांच्या पत्नी निवडणूक लढवत आहेत.या गणा जागेसाठी ठिकाणी मनसे साठी भाजप व दोन्ही काँग्रेस कडून दिला नाही.

तर मोज गणाच्या जागेसाठी मनसेने येथे उमेदवार दिला नाही आणि या जागेसाठी भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,आणि अपक्ष यांच्यात लढत आहे. 

मात्र मोज गण आणि सापणे गण या दोन्ही गणातून तयार झालेल्या  मोज जिल्हा परिषद गटाच्या जागेसाठी भाजप,शिवसेना,काँग्रेस या तीन प्रमुख पक्षात येथे लढत आहे. 

लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत मनसे अध्यक्ष  राज ठाकरेंनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या  कामगिरी विरोधात आणि त्यांच्या कथीत वक्तव्याचा  फॅल्श बॅकचा जाहीर सभेत व्हिडिओ लावून त्यांच्या विरोधात राळ उठवली होती.आज तेच मनसेचे राज ठाकरे यांच्या नगरसेवकाच्या मतदानाने कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचा उमेदवार निवडून येतोय. असा काही राजकीयदृष्टय़ा फायद्याचा  करिष्मा हा पालघर जिल्ह्य़ातील वाडा पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत मनसे कडून भाजपला पहायला मिळेल का? हे पहाणे जनतेला औत्सुक्य ठरणार आहे.

Body:visual moj zp &abhitghar zp
various place in banner photos

Conclusion:ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.