ETV Bharat / state

वाडा तालुक्यातील खुपरी गावात तापाची साथ; ५० हून अधिक जण फणफणले - डेंग्यूची लक्षणे

वाडा तालुक्यातील खुपरी गावात तापाची साथ आली आहे. ५० हुन अधिक जणांना तापाची लागण झाली आहे. १३ रुग्ण भरती असून त्यांच्या मध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

५० हुन अधिक जणांना तापाची लागण, १३ रुग्ण भरती
author img

By

Published : Jun 4, 2019, 12:08 PM IST

Updated : Jun 4, 2019, 2:13 PM IST

पालघर - वाडा तालुक्यातील खुपरी गावात तापाची साथ पसरली आहे. यामुळे आतापर्यंत ५० हून अधिक जण तापाणे फणफणले आहेत. या गावात काही रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणेही आढळून आल्याने त्यांच्यावर वाडा शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

परिस्थितीचा आढावा देतांना वाडा शासकीय ग्रामीण रुग्नालय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव

काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर वाडा ग्रामीण रुग्णालयात १३ जणांना भरती करण्यात आले आहे.यांच्यात डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रुग्णांच्या तपासणी अहवालात डेंग्यूची लक्षणे दिसून आल्यामुळे काही रुग्णांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. सद्या वाडा ग्रामीण शासकीय रुग्णालयात १३ रुगणांवर उपचार सुरू आहेत. काही रुग्णांचे तपासणी अहवाल येणे बाकी असल्यामुळे रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ही साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न डॉक्टरांकडून केले जात आहेत.

Intro:खुपरी गावात तापाची साथ 50 हुन अधिक जणांना तापाची लागण, 13 रुग्णांमध्ये आढळून आली डेंग्यूची लक्षणे
Body:खुपरी गावात तापाची साथ 50 हुन अधिक जणांना तापाची लागण, 13 रुग्णांमध्ये आढळून आली डेंग्यूची लक्षणे

नमित पाटील,
पालघर, दि.4/5/2019

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खुपरी गावात तापाची साथ असून आतापर्यंत ५० हुन अधिक जणांना तापाची लागण झाली आहे. या गावात काही रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळुन आल्यामुळे त्यांच्यावर वाडा शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाडा ग्रामीण रुग्णालयात १३ रुग्ण भरती असून त्यांच्या मध्ये डेंग्यूची लक्षणे आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

वाडा तालुक्यातील खुपरी गावातील ग्रामस्थांना तापाची लागण झाली असून, आतापर्यंत ५० हुन अधिक जणांना तापाची लागण झाली आहे. रुग्णाच्या तपासणी अहवालात डेंग्यूची लक्षणे दिसून आल्यामुळे काही रुग्णांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर सद्या वाडा ग्रामीण शासकीय रुग्णालयात १३ रुगणावर उपचार सुरु आहेत. अजपर्यंत काही रुग्णांचे तपासणी अहवाल येणे बाकी असल्यामुळे रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हि साथ आटोक्यात आण्याचे पर्यंत डॉक्टरांकडून केले जात आहेत.

बाईट -- डॉ प्रदीप जाधव [ वाडा शासकीय ग्रामीण रुग्नालय अधीक्षक ]Conclusion:
Last Updated : Jun 4, 2019, 2:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.