पालघर - कोरोना व्हायरस आजाराचा संसर्ग होऊ नये, म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या परिस्थितीत जीवनावश्यक सेवा सुरू असल्या तरी त्यातही सोशल डिस्टन्सिंग फार महत्त्वाचे आहे. पालघरमध्ये अजूनही काही ठिकाणी नागरिकांकडून आणि शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांकडून लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होताना पाहायला मिळत आहे.
पालघरमधील जुना पालघर येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानांवर तुफान गर्दी दिसून आली. त्यामुळे लॉकडाऊनचा मुख्य उद्देश धुडकावला जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हे धान्य संबंधित लाभार्थ्यांच्या प्रभागात वाटप करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.