पालघर - सरकारने अनलॉक 1 जाहीर केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना मुंबईकडे प्रवास करण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध केली आहे. मात्र, या एसटीचे नालासोपारा ते मुंबई प्रवास भाडे 60 रुपये असल्यामुळे ये-जा करण्यासाठी 120 रुपये भरावे लागत आहे. दररोज तिकीटासाठी 120 रुपये खर्च केले तर आपल्या हातात काय उरणार? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.
पहाटेपासून रांगा लावूनसुद्धा तीन-तीन तास रांगेत उभं राहावं लागत आहे. त्यामुळे कामावर जाण्यास लेट होत असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. वेळेत कामावर न गेल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकीही कंपनीकडून देण्यात येत आहे. त्यामुळे काय करावे, असा मोठा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.