ETV Bharat / state

लोकल सेवा सुरू करा..! विरार रेल्वे स्थानकात प्रवाशांचे आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा तोड्याच प्रमाणात सुरू आहे. यामुळे बस सेवेवर ताण वाढला आहे. मात्र, बसमधून प्रवसी नेण्यावर असलेल्या बंधनामुळे बससेवाही अपुरी पडत आहे. त्यामुळे विरार येथील प्रवासी चांगलेच संतापले आणि त्यांनी रेल्वे स्थानकामध्ये आंदोलन केले.

people
गर्दी
author img

By

Published : Sep 7, 2020, 3:34 PM IST

Updated : Sep 7, 2020, 5:24 PM IST

पालघर (विरार) - विरार रेल्वे स्थानकात आज (7 सप्टें.) संतप्त प्रवाशांनी अचानकपणे आंदोलन केले. सामन्यांसाठी लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या घटनेमुळे रेल्वे स्थानकात तणावपूर्ण वातावरण पसरले होते.

प्रवाशांच्या प्रतिक्रिया
कोरोनामुळे काही महिन्यांपासून सामन्यांसाठी लोकल सेवा ठप्प असल्याने याचा सर्व ताण बस सेवेवर पडत आहे. त्यामुळे प्रवाशांना तासंतास रांगेत उभे रहावे लागत आहे. त्यातही बस मिळेल की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे हा रोजचाच मनस्ताप झाला आहे.दरम्यान, दररोज प्रमाणे आजही प्रवासी बससाठी रांगेत उभे होते. मात्र, बसच्या तुटवड्यामुळे नागरीकांची मोठी पंचाईत झाली होती. त्यामुळे बस स्थानकात उभे असलेले प्रवासी संतप्त होत रेल्वे स्थानकात पोहोचले. यावेळी प्रवाशांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत लवकरात लवकर लोकल सुरू करावी, अशी मागणी केली. यावेळी शेकडो प्रवासी या आंदोलनात सहभागी होते. त्यामुळे रेल्वे स्थानकात तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत संतप्त प्रवाशांना बस आगारात नेले आहे.

हेही वाचा - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात वायुगळती

Last Updated : Sep 7, 2020, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.