ETV Bharat / state

पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल जाहीर; खासदार राजेंद्र गावितांच्या पुत्राचा पराभव - पालघर जिल्हापरिषद पोटनिवडणूक

पालघर जिल्हा परिषदेच्या वणई गटातून शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या चिरंजीवांचा झालेला दारूण पराभव हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो. शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून वणई गटातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र सत्ताधारी असतानादेखील गावितांना ही जागा राखण्यात अपयश आले आहे.

Palghar Zilla Parishad Panchayat Samiti
Palghar Zilla Parishad Panchayat Samiti
author img

By

Published : Oct 7, 2021, 3:56 AM IST

Updated : Oct 7, 2021, 4:04 AM IST

पालघर - पालघर जिल्हा परिषदेच्या 15 व पंचायत समिती मधील 14 जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाले आहेत. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर या निवडणुका घेण्यात आल्या आहेत.

पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना 5 , भाजपा 4, राष्ट्रवादीच्या 5 माकप एका जागेवर विजय मिळवण्यात यश आले आहे. तर जिल्ह्यातील चार पंचायत समिती गणातील 14 जागांच्या पोटनिवडणुकीत शिवसेना 5, भाजप 3, राष्ट्रवादी - 2 बविआ 3 तर मनसेला एका जागेवर विजय मिळवण्यात यश आले आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसला मात्र जिल्ह्यात एकाही जागेवर खात उघडता आले नाही.

पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकाल जाहीर

हेही वाचा-नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक : बूथ नसल्याचा आरोप करत 'वंचित'कडून निवडणूक रद्द करण्याची मागणी

खासदार राजेंद्र गावित यांना धक्का; मुलगा रोहित गावित इयत्ता पराभव-
पालघर जिल्हा परिषदेच्या वणई गटातून शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या चिरंजीवांचा झालेला दारूण पराभव हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो. शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून वणई गटातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र सत्ताधारी असतानादेखील गावितांना ही जागा राखण्यात अपयश आले आहे. या गटात भाजपचे पंकज कोरे विजयी झाले आहेत. त्यांना 3,654 मते मिळाली तर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसच्या वर्षा वायडा यांना 3,242 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे रोहित गावित 3,356 मते मिळवत तिसऱ्या स्थानावर राहिले.

पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणूक निकाल

हेही वाचा-जि.प, पं.स निवडणूक: महाविकास आघाडी वरचढ, नागपुरात काँग्रेस मजबूत

भाजप- मनसे हातमळवणीचा फायदा नाही-
वाडा तालुक्यात भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी चार जागांवर हातमिळवणी केली होती. मात्र त्यापैकी एकाही जागेवर यश मिळवण्यात या दोन्ही पक्षांना यश आले नाही.

हेही वाचा-वाशिम जिल्हा परिषद महाविकास आघाडीला राखण्यात यश, 52 पैकी 31 जागा

शिवसेनेला तीन जागांची बढती तर राष्ट्रवादीच्या दोन जागा कमी-
पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला जागा अधिक मिळाल्या आहेत. त्यांना यावेळी 5 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे या पोट निवडणुकीत नुकसान झाले आहे. पूर्वी असलेल्या 7 जागांपैकी 5 जागेवरच राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. भाजपची गतवेळीचीच स्थिती कायम असून भाजपला 4 जागा मिळाल्या आहेत. माकपने उधवा जि.प. गटात आपले वर्चस्व कायम राखले आहे. काँग्रेसला मात्र या पोटनिवडणुकीत एकही जागा मिळालेले नाही.

या पोटनिवडणुकीतील निकालाचा कोणताही परिणाम पालघर जिल्हा परिषदेच्या सत्तेवर होणार नाही. जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने महाविकास आघाडीचीच सत्ता कायम राहणार आहे.

जिल्हा परिषद पोटनिवडणुक विजयी उमेदवार-
1) नीता पाटील, शिवसेना, नंडोरे- देवखोप
2) विनया पाटील, शिवसेना, सावरे एम्बुर
3) ज्योती पाटील, भाजपा, बोर्डी
4)हबीब शेख, अपक्ष राष्ट्रवादी पुरस्कृत, आसे
5)लतिका बालसी, राष्ट्रवादी, कासा
6) संदीप पावडे, भाजप, आलोंडे
7) अक्षय दवणेकर, माकपा, उधवा
8) सुनील मच्छी, भाजपा, सरावली
9) सारिका प्रकाश निकम, शिवसेना, पोशेरा
10) पंकज कोरे, भाजपा, वणई,
11)भक्ती वलटे, राष्ट्रवादी, अबीटघर
12) अरुण ठाकरे, शिवसेना, मोज
13) रोहिणी शेलार, राष्ट्रवादी, गारगांव
14) मिताली बागुल, शिवसेना, पालसई
15) अक्षता चौधरी, राष्ट्रवादी, मांडे

Last Updated : Oct 7, 2021, 4:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.