पालघर पालघरमध्ये मृत्यूनंतर ही नरक यातना कायम, पालघर मधील तलासरी बोरमाळ भेंडीपाडा येथील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नदीतील पाण्याच्या धोकादायक प्रवाहातून अंत्ययात्रा व नंतर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. रस्ता आणि स्मशानभूमी नसल्याने तलासरी बोरमाळ भेंडीपाडा येथील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्मशानभूमी आणि रस्त्याची ग्रामस्थांकडून मागणी सतत पालघरमध्ये असलेल्या दळणवळणाच्या अभावाच भीषण वास्तव उघड झाला आहे.
ग्रामीण भागात सोयी सुविधांचा असलेला अभाव आणि त्यांचा उडालेला बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. रस्ता आणि स्मशानभूमी नसल्याने मृतदेह नदीच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून कुटुंबीय घेऊन जात असतानाचा हृदय हेलावणारा व्हिडिओ पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील बोरमाळ येथून समोर आला आहे. गुडघाभर पाण्यातून वाट काढत मृतदेह नेण्याची वेळ आली आहे. एवढच नाही तर स्मशानभूमी नसल्याने भर पावसात मृतदेहावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
धक्कादायक व्हिडिओ समोर तलासरी तालुक्यातील बोरमाळ भेंडीपाडा येथील हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी बोरमाळ भेंडीपाडा येथील वयोवृद्ध असलेले मंगू धोडी यांचा मृत्यू झाला. परंतु, त्या गावात स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यसंस्कारासाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. मात्र या पाड्यात स्मशानभूमी नसल्याने आणि नेहमीच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मृतदेह नेण्यासाठी रस्ता नसल्याने मंगू धोडी यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह खांद्यावर घेत काळू नदीच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून हा मृतदेह दुसऱ्या बाजूला नेला.
भर पावसात अंत्यसंस्कार त्यानंतर या मृतदेहावर भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या अंत्ययात्रेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांतून प्रशासानाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान जिल्ह्यात अशा अनेक गंभीर घटना घडत असून प्रशासन या सर्व बाबींकडे लक्ष देईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा MSEDCL Pune जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात वीज खंडित होण्याच्या ३० हजारांहून अधिक घटना