पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण वसई ग्रामीण भागातील आहे. लागण झालेली महिला वसई तालुक्यातील टेम्भी-कोलापूर, ज्योतिपाडा येथील रहिवासी आहे.
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली असता, तिचा तपासणी अहवाल पॉझिटिव आढळून आला. पालघर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. तर आतापर्यंत ४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.