ETV Bharat / state

पालघर जिल्ह्यात पोलीसांनी केली २ हजार ८८८ वाहने जप्त व ३४६ वाहन चालकांविरोधात गुन्हे दाखल - पोलीस बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जीवनावश्यक वस्तू वगळता टाळेबंदी आहे. तरीही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करत पालघर पोलिसांनी २ हजार ८८८ वाहने जप्त केली असून ३४६ वाहन चालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

जप्त केलेली वाहने
जप्त केलेली वाहने
author img

By

Published : Apr 14, 2020, 5:47 PM IST

पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जीवनावश्यक वस्तू वगळता टाळेबंदी आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मागील २१ दिवसात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करत पालघर जिल्ह्यात पोलिसांनी २ हजार ८८८ वाहने जप्त केली असून ३४६ वाहन चालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तरी पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जीवनावश्यक सेवा वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. तरीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता अनेक ठिकाणी नागरिक वाहने घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करत संपूर्ण पालघर जिल्ह्यात मागील २१ दिवसांत पोलिसांनी तब्बल २ हजार ८८८ वाहने जप्त केली असून ३४६ वाहनचालकांना विरोधात गुन्हे दाखल केले केले आहेत. गरज नसल्यास नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये व प्रशासनालाा सहकार्य करावे, असे आवाहन पालघर जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहेे.

हेही वाचा - मिरा भाईंदरमध्ये ४३ जण कोरोनाबाधित, ४९ जणांचे अहवाल प्रलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.