ETV Bharat / state

पालघरच्या वाडा तालुक्यात विधानसभेची जोरदार तयारी; सर्व पक्षांकडून 'मतदारसंघ आढावा' कार्यक्रमांची आखणी

आगामी विधानसभा निवडणुकीत वाडा तालुक्याकडे राजकीयदृष्ट्या विशेष लक्ष केंद्रीत होताना दिसत आहे. वाडा तालुका हा तीन विधानसा मतदारसंघात विभागला असल्याने येथे राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध राजकीय पक्ष अनेक कार्यक्रम, परिसंवाद यांचे आयोजन करताना दिसत आहेत.

पालघरच्या वाडा तालुक्यात विधानसभेची जोरदार तयारी
author img

By

Published : Aug 18, 2019, 9:52 AM IST

पालघर (वाडा) - आगामी विधानसभा निवडणुकीत वाडा तालुक्याकडे राजकीयदृष्ट्या विशेष लक्ष केंद्रीत होताना दिसत आहे. वाडा तालुका हा तीन विधानसभा मतदारसंघात विभागला असल्याने येथे राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध राजकीय पक्ष अनेक कार्यक्रम, परिसंवाद यांचे आयोजन करताना दिसत आहेत.

palhghar wada taluka politics
वाडा तालुक्यात विधानसभेची जोरदार तयारी, सर्व पक्षांकडून "मतदारसंघ आढावा" कार्यक्रमांची आखणी

भाजपकडून पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा वाड्यातील पोशेरी येथे घेण्यात आला. त्यानंतर शिवसेनेकडून विक्रमगड येथे माऊली संवाद माध्यमातून समस्यांचे गाऱ्हाणे ऐकण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. तर सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही यावेळी आपल्या पक्षातील गळती रोखण्यासाठी बैठकाचे आयोजन करीत आहे.

वाडा तालुक्यात विविध राजकिय पक्षांचे प्रतिनिधीत्व

विक्रमगड विधानसभा भाजपच्या ताब्यात आहे तर भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आणि शहापूर विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडूरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने येथे राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे.

वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे राजकीय बलाबल पाहीले, तर शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे 4 सदस्य तर पंचायत समितीचे 5 सदस्य आहे. भाजपचे अनुक्रमे 2 जिल्हा परिषद तर, 5 पंचायत समिती सदस्य आहेत आणि राष्ट्रवादीचा 1 पंचायत समिती सदस्य आहे.

palhghar wada taluka politics
वाडा तालुक्यात विधानसभेची जोरदार तयारी, सर्व पक्षांकडून "मतदारसंघ आढावा" कार्यक्रमांची आखणी

पालघर जिल्ह्यातील वाडा मतदारसंघ पुर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. तेव्हा या भागाचे प्रतिनिधीत्व आमदार विष्णू सावरा यांनी केले होते. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत वाडा विधानसभा मतदारसंघाचे तीन भागात विभाजन झाले. यातील बहुतांश महसुली भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात जोडला गेला. तर उर्वरित कंचाड महसुली मंडळ हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाशी जोडला गेला आहे. विक्रमगड मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात येतो. माजी मंत्री व विद्यमान आमदार विष्णू सावरा हे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघानंतर आता विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

Intro:आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर 

वाड्या" वर लक्षकेंद्रीत 

तीन विधानसभा मतदारसंघातील राजकीय
परिस्थितीचा आढावासाठी कार्यक्रमांची आखणी

पालघर (वाडा) संतोष पाटील 
आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीयदृष्टीने 
वाडा तालुक्याकडे विशेष लक्षकेंद्रीत होताना दिसतेय. वाडा तालुका हा तीन विधानसा मतदारसंघात विभागला असल्याने येथे राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विवीध राजकीय पक्ष विवीध कार्यक्रम,संवाद होताना दिसतोय.
पुर्वी वाडा हा मतदारसंघ म्हणून अनुसूचित जमाती या जागेसाठी राखीव होता.या भागाचे लोकप्रतिनिधीत्व माजी मंत्री आणि आमदार विष्णू सवरा यांनी केले.
त्यानंतर या मतदारसंघ पुनर्रचनेत वाडा विधानसभा मतदारसंघाचे ञिविभाजन झाले.यातील बहूतांशी महसुली भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात जोडला गेला.तर उर्वरित  कंचाड महसुली मंडळ हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघाशी जोडला गेला आहे. हा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात येतोय.माजी मंञी व विद्यमान आमदार विष्णू सवरा हे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघानंतर आता विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. 
राजकीय दृष्टीने वाडा तालुक्यात विभीन्न पक्षाचे येथे विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व आहे.
विक्रमगड विधानसभा भाजपच्या ताब्यात आहे.तर भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आणि शहापूर विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती मान विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार पांडूरंग बरोरा यांनी सेनेचे शिवबंधन बांधून घेतले आहे.
वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे राजकीय बलाबल पाहीले तर शिवसेना 4 जिल्हा परिषद सदस्य तर  5 पंचायत समिती सदस्य तर भाजपचे 2 जिल्हा परिषद सदस्य तर 5 पंचायत समिती सदस्य आहेत.आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 पंचायत समिती सदस्य  असे पक्षीय समीकरण आहे.
दरम्यानच्या काळात भाजपकडून नव नवनिर्वाचित पालघर जिल्हा पालकमंञी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा वाड्यातील पोशेरी इथल्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यानंतर भाजपकडून महाजनादेश याञेची  हाक देताच शिवसेनेकडून विक्रमगड येथे माऊली संवाद माध्यमातून समस्यांचे गाऱ्हाणे ऐकले आणि मतदारसंघाचा आढावा ही जिल्हासंपर्क प्रमुखांकडून घेण्यात आला. 
तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी आपल्यातील गळती रोखण्यासाठी बैठकाचे
 आयोजन करीत होती.
एकंदरीत वाडा तालुक्यातील जनमत हे एखाद्या विधानसभा मतदारसंघातील विनींगची मते ठरू शकतात.यादृष्ट्रीने येथे सद्या डावपेचाचे खेळ सुरू आहेत.
या तालुक्यातील भाजप आहे शिवसेनेचे बाहूबल ओळखून जिल्ह्य़ातील इतर पक्षातील  पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर इनकमींगच्या वेटींग लिस्ट असल्याचे बोललं जाते.पण तुझे माझे पटे ना, तिकीट काही मिळेना म्हणून आआऊटगोईंगचाही वेळेत खेळ होण्याची चर्चा केली जातेय.Body:OkConclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.