ETV Bharat / state

तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटना: पालकमंत्र्यांनी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 या प्लॉटमधील कारखान्यात शनिवारी संध्याकाळी सातत्या सुमारास भीषण स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी)अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पालकमंत्री दादाजी भुसे
पालकमंत्री दादाजी भुसे
author img

By

Published : Jan 12, 2020, 12:10 PM IST

पालघर - तारापूर औद्योगिक वसाहतीतील तारा नायट्रेट (ए. एन. के फार्मा) कंपनीत स्फोट होऊन दुर्घटना झाली. यात सात कामगारांचा मृत्यू आणि सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी)अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे भुसे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांनी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोट: राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
तारापूर औद्योगिक वसाहतीतील एम 2 या प्लॉटमधील कारखान्यात शनिवारी संध्याकाळी सातत्या सुमारास भीषण स्फोट झाला. यानंतर तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी जखमी आणि मृत कामगारांचा शोध घेण्याचे करत होते. मात्र, अपघाताची तीव्रता पाहता राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला पाचारण करण्यात आले. कंपनीच्या आवारामध्ये आत्तापर्यंत सात मृतदेह शोधण्यात आले असून आणखी एक मुलगी बेपत्ता आहे.

Intro:पालकमंत्री दादा भुसे यांनी एम.पी.सी.बीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवरBody:पालकमंत्री दादा भुसे यांनी एम.पी.सी.बीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

पालघर

पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तारा नायट्रेट या कंपनीत काल ब्लास्ट होऊन भीषण दुर्घटना घडली . यात सात कामगारांचा मृत्यू तर सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत . अजूनही एक मुलगी बेपत्ता असून तिचा शोध एनडीआरएफच्या टीम कडून सुरू आहे . सदर घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे आणि विधान परिषद आमदार रवींद्र फाटक यांना आज सकाळी पुन्हा घटनास्थळी धाडले. यावेळी पालकमंत्र्यांनी एम.पी.सी. बीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख तर जखमींना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येईल तर काही वेळातच घटनास्थळी उद्योगमंत्री सुभाष देसाई भेट देऊन सदर मदत सुपूर्त करतील अशी माहिती फाटक यांनी दिली . या प्रकरणातील दोषींना पाठिशी न घालता कारवाई करण्यात येईल असा इशारा यांनी दिलीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.