पालघर - विधानसभेच्या निवडणुकी अगोदरपासून काँग्रेस पक्षात सुरू झालेले आऊट गोईंग अजूनही थांबलेले दिसत नाही. पालघर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार योगेश नम यांचे मोठे बंधू सुधीर नम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा... शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला
सुधीर नम यांचा शिवसेनेत प्रवेश
काँग्रेसचे माजी मंत्री शंकर नम यांचे चिरंजीव आणि पालघर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार योगेश नम यांचे मोठे बंधू सुधीर नम यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि जिल्हाप्रमुख राजेश शाह यांच्या उपस्थितीत सुधीर नम यांचा सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पालघर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही दिवस उरले असताना उमेदवाराच्या सख्ख्या भावानेच अशाप्रकारे शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसची अवस्था पालघर विधानसभा मतदारसंघात अधिकच बिकट झाली आहे.
हेही वाचा... भाजपचे संकल्पपत्र म्हणजे गाजरांचा पाऊस; सुप्रिया सुळेंचा निशाणा