पालघर - महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर करतांना अनेक दिग्जांना देखील नाकी नऊ येतात. मात्र डहाणू येथील धनुष अमोल तांडेल या अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याने कळसुबाई शिखर सर केले आहे. चार वर्ष्याच्या चिमुकल्याने कळसुबाई शिखर सर केल्याणे हा कुतूहलाचा विषय बनला असून, या चिमुकल्याचे त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
गडप्रेमी वडिलांना पाहून निर्माण झाली गड-किल्ले सर करण्याची आवड -
पालघर जिल्ह्यातील डहाणू मधील धनुष पांडे हा केवळ चार वर्षांचा असून त्याचे वडील अमोल तांडेल हे गडप्रेमी आहेत. धनुषचे वडील अमोल हे वेगवेगळ्या शिखरांवर आणि गडांवर ट्रेकिंगसाठी जायचे आणि घरी परतल्यावर त्यांनी काढलेले व्हिडिओ, फोटो धनुष पाहायचा. याच माध्यमातून त्याला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. साधारण वर्षभरापूर्वी धनुष आपल्या वडिलांसोबत पहिल्यांदा डहाणूच्या महालक्ष्मी गडावर गेला आणि कुणाच्याही मदतीविना गडावर चढला. त्यानंतर धनुष आपल्या वडिलांसोबत अनेक गड-किल्ल्यांवर नेहमी जात असतो.
चिमुकल्याने 3 तास 50 मिनिटात सर केले कळसुबाई शिखर:-
धनुषचे वडील अमोल तांडेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई येथे जाण्याचे ठरवले. धनुषने स्वतः कळसुबाई शिखर मोहिमेवर तयारी दाखवली, त्यामुळे धनुषला त्यांनी बरोबर घेतले. चार वर्षाचा चिमुकला धनुष याने कोणाचीही मदत न घेता कळसुबाई शिखर सर करण्याची किमया साधली आहे. धनुषने अवघ्या 3 तास 50 मिनिटांच्या कालावधीत हे शिखर सर केले व शिखरावरून खाली उतरण्यासाठी 2 तास 35 मिनिटे इतका कालावधी लागला. कळसुबाई शिखर सर केल्यानंतर तेथे आलेल्या पर्यटकांनाही चिमुकल्या धनुष्य सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
हेही वाचा- अर्णब गोस्वामी चॅट लीकवरून अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल