पालघर - विक्रमगड येथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पांडुरंग भिवा डावरे (४८) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो चरी गावचा रहिवासी आहे.
जिल्ह्यात बहुतांश भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. पावसामुळे विक्रमगड तालुक्यातील आपटी-भोपोळी दरम्यानचा नाला भरून वाहत आहे. हाच नाला पार करताना मंगळवारी डावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले. आज दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला.