ETV Bharat / state

'निसर्ग चक्रीवादळाचा धोका, मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नका' - निसर्ग चक्रीवादळ

संभाव्य चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पालघर जिल्हा आणि परिसरातील मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये. तसेच नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

Fisherman palghar
मच्छिमार पालघर
author img

By

Published : Jun 1, 2020, 9:33 PM IST

पालघर - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पश्चिम किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील नागरिकांनी आणि विशेषतः मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची प्रतिक्रिया...

अरबी समुद्राच्या अग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या ४८ तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. 'निसर्ग' असे त्याचे नामकरण करण्यात आलेले आहे.

हेही वाचा... खुशखबर! केरळमध्ये मान्सून दाखल, सात दिवसांत महाराष्ट्रात येण्याची शक्यता

पालघर, डहाणू, वसई या तीन तालुक्यातील किनारपट्टीवरील कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पक्क्या घरात किंवा शाळेत आसरा घ्यावा. हवामान विभागाने वर्तविलेल्या चक्रीवादळाच्या शक्यतेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज होत असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. पालघर जिल्ह्यातील मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५७७ पैकी ४७७ बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर परतल्या असून १०० बोटी अजूनही समुद्रात आहेत. या बोटींना समुद्रकिनारी परतण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.