ETV Bharat / state

वसई विरारमध्ये शनिवारी आढळले 224 नवे रुग्ण; 277 जणांची कोरोनावर मात

शनिवारी आलेल्या कोरोना चाचणीच्या अहवालानंतर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 960 वर जावून पोहोचली आहे.

Vasai virar
वसई-विरार महापालिका
author img

By

Published : Jul 5, 2020, 8:51 AM IST

पालघर : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वसई-विरारमध्ये शनिवारी एकाच दिवसात 224 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. शनिवारी दिवसभरात 2 रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शनिवारी आलेल्या कोरोना चाचणीच्या अहवालानंतर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार 960 वर जावून पोहोचली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 127 रुग्णांचा कोरोनामुळे उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत 2 हजार 668 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांवर रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.