विरार - नालासोपारा पूर्वेच्या लक्ष्मी नगर परिसरात कचऱ्याच्या ढिगात एक नवजात बालक गोणीत भरून फेकून दिलेले आढळले ( newborn baby in a garbage dump ) आहे. नुकतेच जन्मलेले हे मूल सकाळी पहाटेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी ठेवण्यात आलेले ( newborn baby found pile of garbage ) होते.
चार तास कचऱ्यात होते मुल - तीन ते चार तास हे मूल याच ठिकाणी पडून होते; मात्र जेव्हा स्थानिक नागरिकांना कचऱ्यातून त्याच्या रडण्याचा आवाज आल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. ज्या ठिकाणी हे मूल फेकण्यात आले होते. त्या ठिकाणी कुत्रे व डुक्करांचा वावर होता. सुदैवाने या नवजात बालकाला कोणतीही इजा झालेली नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी आचोळे पोलिसांना याबाबत माहिती दिली. बाळाला उपचारासाठी पालिका रुग्णालयात दाखल केले आहे.
पालकांविरोधात गुन्हा दाखल - आचोळे पोलिसांनी ( Achole police station ) या प्रकरणी बाळाच्या त्याच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून; त्यांचा शोध घेतला जात आहे. ज्या कुणाचं हे मूल आहे; त्यांनी आताही येऊन त्याला घेऊन जायला हवं. मुळात मुलं सांभाळायचीच नसतात तर त्यांना जन्माला तरी घालू नये. किमान त्यांची अवहेलना तरी होणार नाही.