पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कालच्या (शनिवारी) चोवीस तासात 13 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून, 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसचे 29 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी आढळलेल्या 13 कोरोना रुग्णांपैकी 8 रुग्ण पालघर तालुक्यातील, 4 वसई ग्रामीण मधील तर एक वाडा तालुक्यातील आहे. 2 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला असून, या मृतकांपैकी एक रुग्ण विक्रमगड तर दुसरा रुग्ण पालघर तालुक्यातील आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 583 झाली असून, 11 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 252 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 320 कोरोना रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
राज्यातील परिस्थिती -
राज्यभरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार वाढत आहे. शनिवारी ३८७४ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी १३६ रुग्ण मुंबईतील आहेत. सध्या राज्यात ५८ हजार ५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर १३८० रुग्णांनी शनिवारी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.