ETV Bharat / state

बोगस कॉल सेंटरचा नवी मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश; सात जणांना अटक - नवी मुंबई पोलीस

सेक्टर 20 मधील इमारतीच्या फ्लॅटमध्ये अवैधरित्या कॉल सेंटर सुरू होते. त्या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. त्यानुसार रबाळे पोलिसांनी सायबर एक्सपर्टसह या कॉल सेंटरवर छापा टाकला. यावेळी संबंधित कॉल सेंटरमधून दहा लॅपटॉपच्या साह्याने व्हिओआयपीच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना फोन करत व त्यातून त्यांची फसवणूक करत असल्याचे पुढे आले आहे.

पोलीस
पोलीस
author img

By

Published : Nov 21, 2021, 1:14 AM IST

Updated : Nov 21, 2021, 1:38 AM IST

नवी मुंबई - ऐरोली परिसरातून एका ॲमेझॉन कंपनीच्या नावे चालविल्या जाणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा (Bogus call center) नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी नौशाद रजी अहमद शेख (24), सौरभ सुरेश दुबे (26), आसिफ अमित शेख (23), मेहताब आयुब सय्यद( 27), हुनेद शब्बीर कोठारी( 35), सूरज मोहन सिंग (25), धर्मेश राकेश सालीयन (32) या सात जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शिवशंकर हाईट सेक्टर 20 मधील इमारतीच्या फ्लॅटमध्ये अवैधरित्या कॉल सेंटर सुरू होते. त्या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. त्यानुसार रबाळे पोलिसांनी सायबर एक्सपर्टसह या कॉल सेंटरवर छापा टाकला. यावेळी संबंधित कॉल सेंटरमधून दहा लॅपटॉपच्या साह्याने व्हिओआयपीच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना फोन करत व त्यातून त्यांची फसवणूक करत असल्याचे पुढे आले आहे.

बोगस कॉल सेंटरचा नवी मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

ॲमेझॉन अकाउंट हॅक झाल्याचे सांगत करत असत फसवणूक

ॲमेझॉनच्या नावाने बोगस कॉल सेंटर सुरू करून संबंधित व्यक्ती अमेरिकन नागरिकांना त्यांचे ॲमेझॉन अकाउंट हॅक झाल्याचे सांगत. ते पुन्हा सुरू करायचे असेल तर आपल्याला काही रक्कम भरावी लागेल. ती रक्कम ग्राहकांना चेकद्वारे परत दिली जाईल, असे सांगून ते पैसे स्वतःच्या अकाउंटमध्ये वळते करून घ्यायचे. हा प्रकार संबंधित गुन्हेगारांनी ॲमेझॉन कंपनीचा कॉल डाटा हॅक करून घेतला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून दहा लॅपटॉप, दोन राउटर, आठ मोबाइल फोन, चार हेडफोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा - cousin Murder : अर्ध्या एकर शेतीच्या वादातून दगडाने ठेचून चुलत भावाची केली हत्या

Last Updated : Nov 21, 2021, 1:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.