पालघर (वसई) - मित्राच्या बायकोला पळवून नेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना प्रकरण नालासोपाऱ्यातील वाकण पाडा येथे घडली आहे. आरोपी फरार असून या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
मृत जावेद सरवर (२०) हा बिस्मिल्ला हॉटेलच्या बाहेर पान टपरी चालवतो. त्याचा भाऊ नावेद सरवरचा मित्र उस्मानच्या बायकोला मुश्ताकने पळवून नेले होते. याविषयी नावेदने मुश्ताकशी जाब विचारला. याचा मनात राग धरत मुश्ताक नावेदला मारण्यासाठी आला होता. मात्र, तो न मिळाल्याने त्याचा भाऊ जावेदशी त्याची बाचाबाची झाली. आणि त्याने जावेदचीच हत्या केली. अशी माहिती जावेदच्या नातेवाईकांनी सांगितली. पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.