ETV Bharat / state

Palghar Lynching Case : पालघर लिंचिंग प्रकरणात 10 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

author img

By

Published : Apr 1, 2022, 9:02 PM IST

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी निकाल देताना म्हटले आहे, की 10 आरोपींना जबाबदार धरता येईल ( bail to 10 accused ) असे कोणतेही उघड कृत्य नव्हते. त्यांच्या जामीन अर्जाला परवानगी दिली आहे. तर 8 आरोपींना जामीन नाकारण्यात ( Palghar Lynching Case ) आला. कारण ते आता मृत साधूवर हल्ला करताना सीसीटीव्हीमध्ये ( CCTV of Sadhu lynching case ) दिसत होते. त्यामुळे त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालय

मुंबई- एप्रिल 2020 मध्ये पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात ( Palghar mob lynching case ) दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळवण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाने धाव घेतली होती. न्यायालयाने 1 एप्रिल रोजी या प्रकरणातील 10 आरोपींना जामीन मंजूर केला आहे. तर 8 आरोपींना जामीन नाकारण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून 228 आरोपींना अटक करण्यात आली होती.

ही जामीन मंजूर आणि फेटाळण्यात आलेल्या आरोपींची नावे- राजू गुरुड, विजय पिलेना, रिशा पिलेना, दीपक गुरुड, सीताराम राठोड, विजय गुरुड, रत्ना भवर, ईश्वर निकोले, फिरोज साठे आणि मोहन गावित अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर राजल गुरुड, महेश गुरुड, लहान्या वालाकर, संदेश गुरुड, हवासा साठे, भाऊ साठे, रामदास राव आणि राजेश राव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

194 आरोपींना ठाणे न्यायालाकडून जामीन मंजूर- साधुंच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सीआयडीने डहाणू कोर्टात 11 हजार पानांचे दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात कोणतेही जातीय कारण नसून काही अफवा असल्याचा दावा सीआयडीने तपासणीत केला होता. पालघर साधू हत्याकांडप्रकरणी एकूण 228 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ज्यामध्ये 12 आरोपींचे वय 18 वर्षाखालील होते. त्यामध्ये 75 जणांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे. तर हत्येप्रकरणी 808 संशयितांची चौकशी करण्यात आली होती. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या 194 आरोपींना ठाणे न्यायालाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला होता.

काय आहे प्रकरण- 16 एप्रिल 2020 रोजी कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे लॉकडाउनच्या काळात गुजरातकडे चालले होते. गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहन चालकासह तिघे जण होते. दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली होती.

पोलिसांच्या वाहनांवरही हल्ला- पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत 101 जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.

हेही वाचा-Home Minister On Raut : संजय राऊत यांची भावना योग्यच गृहमंत्री वळसे- पाटील यांच्याकडून दुजोरा

हेही वाचा- Allegations of Nitesh Rane : गिरगाव चौपाटी दर्शक गॅलरी - पालिकेने नितेश राणेंचे आरोपातील हवा काढली

हेही वाचा-Central Railways Megablock : रविवारी मध्य रेल्वेचा तब्बल बारा तासाचा मेगाब्लॉक ; लोकलसह मेल- एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.