पालघर - केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदरचा विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील गाव, दुकाने, मच्छी मार्केट बंद ठेवण्यात आली होती. या आंदोलनाला मुंबईतील कफ परेड भागातील काही मच्छिमारांनी पाठिंबा दिला. मात्र या पाठिंब्यात वाढवण बंदर विरोधाला समर्थन देत असताना मुंबईतील खार दांडा कोळीवाडा मच्छिमारांनी वांद्रे वर्सोवा सी-लिंकलाही विरोधाचे फलक झळकवले आहेत. त्यामुळे मुंबईतील मच्छिमारांचा सी-लिंकला ही विरोध असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर!...'या' तारखेला भारत खेळणार वर्ल्डकपचा पहिला सामना
पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विरोधाची तीव्रता वाढू लागली आहे. याचा परिणाम आता विविध आंदोलनात दिसून येत आहे. १५ डिसेंबर रोजी मुंबईच्या कफ परेड मार्केट ते गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या तलसारी डहाणू भागातील झाई बंदर किनाऱ्यावरील बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचे मच्छिमार संघटनेकडून सांगितले जात आहे. या बंदला वाढवण बंदर विरोध संघर्ष समितीकडून पालघर जिल्ह्यातील आमदारांकडे निवेदने देण्यात आली. यावर पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा आणि कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी विधानभवन येथे प्रसारमाध्यमांसमोर येत विरोध दर्शवला.
![Mumbai fishermen support Wadhwan port protest](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9892993_fghhnjnhnm.jpg)
![Mumbai fishermen support Wadhwan port protest](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9892993_fgfgfg.jpg)
मानवी साखळी एकजूट -
मुंबई ते पालघर जिल्ह्याच्या झाई किनारपट्टीपर्यंतचा बंद उत्स्फूर्तपणे पार पडला. यात सायंकाळी मच्छिमार समाजाने समुद्रकिनारी एकत्र येत मानवी साखळी तयार करुन या वाढवण बंदर विरोधात घोषणा दिल्या. सातपाटी बंदरमधील शीतगृह बंद ठेवल्यामुळे तेथील मासळीबाजार बंद राहिला.
![Mumbai fishermen support Wadhwan port protest](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9892993_fgfggffgt.jpg)