ETV Bharat / state

पालघरमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, डहाणू पोलिसात गुन्हा दाखल - palghar rape case news

मुंबईस्थित एका डॉक्टरने सहकर्मचारी तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडितेने गुरुवारी डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महिला कर्मचारीवर अत्याचार
महिला कर्मचारीवर अत्याचार
author img

By

Published : Oct 29, 2020, 6:49 PM IST

पालघर - जिल्ह्यात लग्नाचे आमिष दाखवून एका डॉक्टकडून सहकर्मचारी तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवारी डहाणू पोलीस ठाण्यात सदर डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सदर पीडितेने गुरुवारी याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार, मुंबईस्थित आरोपी डॉक्टरने पीडितेवर जुलै २०१८ ते सप्टेंबर २०२० या काळात लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचे नमूद केले आहे. तसेच, गर्भवती राहिल्यानंतर त्याने जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. पीडितेने गर्भपात करण्यास नकार दिल्यावर त्याने तिला दम देऊन त्यांच्यातील काही व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली. तसेच तिला वारंवार त्रास देऊन शोषण करायचा असेही दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

डहाणू पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या याबाबत चौकशी सुरू असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती डहाणू पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हॉटेलमधील रोख रक्कम घेऊन चोरटा पसार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.