ETV Bharat / state

राजेंद्र गावितांकडून 'कोरोना'च्या उपाययोजनांसाठी खासदार निधीतून एक कोटींची मदत जाहीर

लॉकडाऊनमुळे हातचे काम गेल्यानंतर रोजंदारीवर काम करणारे अनेक कामगार कुटुंबासह महाराष्ट्र सोडून आपापल्या गावी पायी निघाले होते. मात्र, राज्यांच्या सीमा बंद असल्याने हे कामगार महाराष्ट्र-गुजरात सीमेवर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच अडकून पडले. या सर्व नागरिकांची प्रशासनामार्फत सध्या तलासरी येथील महाविद्यालयात जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

author img

By

Published : Mar 31, 2020, 9:19 PM IST

MP Rajendra Gavit visited dependent laborers camp at Talasari
खासदार राजेंद्र गावितांनी तलासरी येथे आश्रित परप्रांतीय मजूरांची घेतली भेट घेतली

पालघर - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या धास्तीने अनेक परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहनाने अथवा पायी चालत आपल्या गावी निघाले आहेत. असेच काही हजारो कामगार गावी जात असताना प्रशासनाने अडवल्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अडकले होते. या कामगारांची तलासरी येथील महाविद्यालयात तात्पुरती राहण्याची व्यवस्था पालघर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी या ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच गावित यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी खासदार निधीतून एक कोटींची मदत जाहीर केली आहे.

खासदार राजेंद्र गावितांकडून 'कोरोना'च्या उपाययोजनांसाठी खासदार निधीतून एक कोटींची मदत जाहीर

प्रशासनाकडून मजुरांची, कामगारांची निवाऱ्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था योग्यरित्या केली आहे. तसेच कोणीही घाबरून न जाता याच ठिकाणी रहावे, असे आवाहनही राजेंद्र गावीत यांनी केले आहे. यावेळी खासदारांनी येथे असलेल्या कामगारांना जेवण आणि फळ आदींचे वाटप केले.

हेही वाचा... कोरोना उपाययोजनांसाठी २५ लाखांचा निधी; राज्यातील खासदारांपुढे श्रीनिवास पाटलांचा आदर्श

लॉकडाऊनमुळे हातचे काम गेल्यानंतर मुंबई, कल्याण, पुणे, नवी मुंबई , ठाणे इत्यादी ठिकाणी रोजंदारीवर काम करणारे कामगार कुटुंबासह महाराष्ट्र सोडून आपापल्या गावी पायी निघाले होते. मात्र, राज्यांच्या सीमा बंद असल्याने हे कामगार महाराष्ट्र-गुजरात सीमेवर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच अडकून पडले होते. या सर्व नागरिकांची प्रशासनामार्फत सध्या तलासरी येथील महाविद्यालयात जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.