पालघर - जिल्ह्यातील बोईसर परिसरात एका पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी हा अल्पवयीन असून याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन आरोपीने केला बलात्कार -
पालघर तालुक्यातील बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात पाच वर्षीय मुलीवर सोमवारी रात्रीच्या सुमारास अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीच्या नातेवाईकांनी तशी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिप्रसंग करणारा आरोपी 12 वर्षीय अल्पवयीन आहे. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयासमोर (जुविलीयन कोर्ट) हजर केले जाणार आहे.
हेही वाचा - मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक