ETV Bharat / state

मनीषा निमकर पुन्हा बहुजन विकास आघाडीत; जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दाखल

author img

By

Published : Dec 26, 2019, 10:39 AM IST

मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीमधून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता.

palghar ZP election candidate
मनीष निमकर

पालघर - माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी आपली भूमिका बदलून पुन्हा बहुजन विकास आघाडीमधून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी शिवसेनेतून पालघर पंचायत समितीच्या उपसभापती पदापासून राजकीय कारकीर्द सुरू केली होती. आता त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर लक्ष ठेवले आहे.

मनीषा निमकर यांनी गेल्या 1992 मध्ये पालघर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून निवडून येऊन आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू केली होती. 1995, 1993 व 2004 अशी शिवसेनेमधून आमदारकीची हॅट्रिक देखील त्यांनी साधली. तसेच त्यांना २००८ नंतर राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. सन 2009 मध्ये शिवसेनेकडून पुन्हा निवडणूक लढवताना पक्षामध्ये झालेल्या बंडखोरीमुळे त्यांचा पराभव झाला होता.

गेल्या 2014 मध्ये त्यांनी पक्षांतर करून बहुजन विकास आघाडी तर्फे पालघर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर 2016 मध्ये झालेल्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत देखील त्यांनी बहुजन विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली होती. मात्र, त्या पराभूत झाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीतर्फे त्यांच्या नावाचा विचार केला जात होता. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर भाजप पुन्हा सत्तास्थानीच राहील, असे अंदाज व्यक्त होऊ लागले. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

palghar ZP election candidate
भाजपमध्ये प्रवेश करताना मनीषा निमकर

आपला भाजप प्रवेश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित किंवा त्यांच्या हस्ते व्हावा यासाठी आग्रही राहिलेल्या मनीषा निमकर यांच्या पक्षांतराचे काही मुहूर्त या भूमिकेमुळे हुकले होते. अखेर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात फडणीवासांच्या जव्हार येथील प्रचार सभेतील व्यासपीठावर त्यांनी त्यावेळचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी डहाणू मतदार संघातील भाजपचे उमेदवार पास्कल धनारे यांचा प्रचार देखील जोमाने केला. मात्र, निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय बदलानंतर तसेच भाजपमधील मंडळींनी मनीषा निमकर यांचा स्वीकार न केल्याने त्या एकाकी पडल्या होत्या.

पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्याचे जाहीर झाल्यानंतर मनीषा निमकर यांनी आपली भूमिका पुन्हा बदलली. त्यानंतर त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या स्थानीय कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या सफाळे येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी उपस्थित लावली. त्यांनी या बैठकीत आपण पक्षांतर केले नसल्याचा निर्वाळा केला. त्याच पद्धतीने त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधून सफाळे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळवली. त्यामुळे शिवसेना, बहुजन विकास आघाडी, भाजप असा प्रवास करून निमकर पुन्हा बहुजन विकास आघाडीचा कंपू मध्ये दाखल झाल्या आहेत.

याविषयी मनीषा निमकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण वैयक्तिक कामानिमित्त जव्हार येथे फडणवीस यांना भेटायला गेल्याचे सांगितले. तसेच भाजपमध्ये पक्षप्रवेश केला नसल्याचे सांगितले. आपण बहुजन विकास आघाडीमध्ये होतो व पुढे राहू असे त्यांनी सांगितले. मात्र, निमकर यांच्या भूमिका बदलामुळे बहुजन विकास आघाडीचा स्थानिक कार्यकर्ता बुचकळ्यात पडला आहे.

Intro:मनीषा निमकर पुन्हा बहुजन विकास आघाडीत; जिल्हा परिषदेच्या जागेकरिता दाखल केली उमेदवारी; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केला होता भाजप मध्ये प्रवेश
Body:मनीषा निमकर पुन्हा बहुजन विकास आघाडीत; जिल्हा परिषदेच्या जागेकरिता दाखल केली उमेदवारी; विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केला होता भाजप मध्ये प्रवेश

नमित पाटील,
पालघर, दि. 26/12/2019

    विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडी सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी आपली भूमिका बदलून पुन्हा बहुजन विकास आघाडी मधून जिल्हा परिषदेच्या जागेकरिता उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेनेततून पालघर पंचायत समितीच्या उपसभापती पदापासून राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या मनीषा निमकर यांनी आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर लक्ष ठेवले आहे. 

    1992 मध्ये पालघर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून निवडून येऊन मनीषा निमकर यांनी आपली राजकीय कार्तिद शिवसेनेतून सुरू केली होती. 1995, 1993 व 2004 अशी शिवसेने मधून आमदारकीची हॅट्रिक साधणार्‍या मनीषा निमकर यांना 2008 नंतर राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. सन 2009 मध्ये शिवसेनेकडून पुन्हा निवडणूक लढवताना पक्षामध्ये झालेल्या बंडखोरीमुळे त्यांचा पराभव झाला होता.

      सन 2014 मध्ये त्यांनी पक्षांतर करून बहुजन विकास आघाडी तर्फे विधानसभा निवडणूक पालघर मतदारसंघातून लढवली होती त्याचप्रमाणे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर 2016 मध्ये झालेल्या पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत देखील त्यांनी बहुजन विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवताना त्या पराभूत झाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीकरिता बहुजन विकास आघाडी तर्फे त्यांच्या नावाचा विचार केला जात होता, मात्र निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा पुन्हा सत्तास्थानीच राहील असे अंदाज व्यक्त होऊ लागल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

     आपला भाजपा प्रवेश तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित किंवा त्यांच्या हस्ते व्हावा याकरिता आग्रही राहिलेल्या मनीषा निमकर यांच्या पक्षांतराचे काही मुहूर्त या भूमिकेमुळे हुकले होते. अखेर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री यांच्या जव्हार येथील प्रचार सभेतील व्यासपीठावर त्यांनी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपा प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी डहाणू मतदार संघातील भाजपाचे उमेदवार पास्कल धनारे यांच्या प्रचार देखील जोमाने केला. मात्र निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय बदलानंतर तसेच भाजपामधील मंडळींनी मनीषा निमकर यांचा स्वीकार न केल्याने त्या एकाकी पडल्या होत्या

      पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलांकरिता राखीव झाल्याचे जाहीर झाल्यानंतर मनीषा निमकर यांनी आपली भूमिका पुन्हा बदलली व बहुजन विकास आघाडीच्या स्थानीय कार्यकर्त्यांची संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या सफाळे येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी उपस्थित लावली. आपण पक्षांतर केले नसल्याचा निर्वाळा त्यांनी या बैठकीत केला. त्याच पद्धतीने त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधून सफाळे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळवण्यात त्यांना यश लाभले आहे. त्यामुळे शिवसेना, बहुजन विकास आघाडी, भाजपा असा प्रवास करून मनिषा नंतर पुन्हा बहुजन विकास आघाडीचा कंपू मध्ये दाखल झाल्या आहेत.

     याविषयी मनीषा निमकर यांच्याशी संपर्क साधला असता आपण पण वैयक्तिक कामानिमित्त जव्हार येथे मुख्यमंत्री यांना भेटायला गेल्याचे सांगितले. तसेच भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याच्या घटनेचा इन्कार केला आहे. आपण बहुजन विकास आघाडी मध्ये होतो व पुढे राहू असे त्यांनी सांगितले. मात्र निमकर यांच्या भूमिका बदलामुळे बहुजन विकास आघाडीचा स्थानिक कार्यकर्ता बुचकळ्यात पडला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.