ETV Bharat / state

महिलांवर अत्याचार करून, पॉर्नसाइटवर व्हिडीओ टाकणाऱ्याला अटक - पालघर जिल्हा

महिलांवर अत्याचार करून त्यांचे व्हिडीओ पॉर्नसाइटवर टाकणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल झडे असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो ठाणे महापालिकेचा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

Palghar Crime News
पॉर्न साईटवर व्हिडिओ टाकणाऱ्या आरोपीला अटक
author img

By

Published : Oct 30, 2020, 3:43 PM IST

पालघर - महिलांवर अत्याचार करून त्यांचे व्हिडीओ पॉर्नसाइटवर टाकणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल झडे असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्यावर जिल्ह्यातल्या वालिव आणि विक्रमगड पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल झडे हा फरार होता. विक्रमगडमधल्या पाचमाडमध्ये तो येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी अनिल झडे याला अटक केली.

पॉर्न साईटवर व्हिडिओ टाकणाऱ्या आरोपीला अटक

आरोपी महापालिकेचा कर्मचारी

झडे हा ठाणे महापालिकेत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. अनिल झडे हा महिलांना फसवून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवत असे व त्यानंतर तो हे व्हिडीओ पॉर्नसाइटवर अपलोड करत होता. आतापर्यंत त्यांने 62 व्हिडीओ अपलोड केले असून, यामधून त्याला 5 लाख रुपये मिळाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.